ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण
![]()
ब्राम्हणवेलमधील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात ५ वी चावडी वाचन प्रकल्प यशस्वी सादरीकरण
धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी)
माळामाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील कै बळीराम दादा माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीच्या चावडी वाचन प्रकल्पाचे औपचारिक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री बंशीलाल माळी प्रमुख पाहुणे होते. तसेच उपस्थित होते श्री बाजीराव निकुंभ, श्री काशिनाथ माळी, रवींद्र सूर्यवंशी आणि इयत्ता ५ वी चे वर्गशिक्षक श्री हिरामण सोनवणे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकातील विविध पाठांचे प्रभावी वाचन तसेच गणितीय मूलभूत क्रियांचे सादरीकरण केले. विद्यार्थी कु. सोनाली चौधरी, कार्तिक सोनवणे, योगेश गावित, ऋतिक चौधरी, सुमित शेंडाळे, अर्श खाटीक, अविनाश ठाकरे, भावेश कोरे व ममता जव्हेरी यांनी आपली तयारी उत्कृष्टपणे सादर केली.
शिक्षक व प्रशासनाकडून आयोजनाबाबत कौतुक व्यक्त केले असून, कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. इयत्ता ५ वी चा वर्गशिक्षक श्री हिरामण सोनवणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आणि प्रास्तविक केले. रविंद्र सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.
शासनाच्या आदेशानुसार घेतलेल्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना वाचन आणि गणितात आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.

