धर्मसेवक डॉ.सोन्या पाटील यांचा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने यथोचित सन्मान ! *धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील हे खरोखर जनसामान्यांचे आधारस्तंभ आहेत.: डॉ.मनिलाल शिंपी
![]()
धर्मसेवक डॉ.सोन्या पाटील यांचा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने यथोचित सन्मान !
*धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील हे खरोखर जनसामान्यांचे आधारस्तंभ आहेत.: डॉ.मनिलाल शिंपी
*
ठाणे:भिवंडी (प्रतिनिधी)
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, !!जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले!! !!तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!! आधार एक हात मदतीचा या उक्ती प्रमाणे मानवसेवेचे व्रत हाती घेतलेले असे आमचे सन्मित्र धर्मसेवक डॉ.सोन्या काशीनाथ पाटील यांना नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी (आर.एस.पी कमांडर), दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील,चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे संचालक व भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे यांनी अभिनंदन केले.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर, पोलीस पाटील संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ ठाकरे, मोटिव्हेशनल स्पीकर,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर, रोटी डे ग्रुप चे डॉ.नितील चांदिया, डॉ.निलेश नागडा,कच्छ युवक संघाचे डॉ.तरुण नागडा, लेडीज एक्सप्रेस चा प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, ज्ञानशी फाउंडेशनच्या सौ.साधना बुगले, सौ.पाटील मॅडम, कल्याण शिंपी समाज सचिव श्री.अरविंद शिंपी, स्वच्छ भारत अभियान ग्रुप चे मृत्युंजय शुक्ला, यांनीही धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

