श्रीरामपूरात रविवारी वर्ल्ड पार्लमेंट सोहळ्यात होणार अनेक मान्यवर सन्मानित
1 min read

श्रीरामपूरात रविवारी वर्ल्ड पार्लमेंट सोहळ्यात होणार अनेक मान्यवर सन्मानित

Loading

श्रीरामपूरात रविवारी वर्ल्ड पार्लमेंट सोहळ्यात होणार अनेक मान्यवर सन्मानित

श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ” ग्रेट लेडी इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ ” तर पुरुषांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ ” देऊन सन्मानीत करण्यात येणार असून सदर कार्यक्रम रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी श्रीरामपूर, जिल्हा -अहिल्यानगर, येथे सकाळी ठिक १० वाजता
सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता प्रदीप गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत कुमार ओगले, भाजपाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते नितीन दिनकर, जगातील सर्वोच्च पुरस्कार नोबल अवॉर्ड निवड समिती सदस्य डॉ. सुधीर तारे, ऑर्गन डोनेशन मॅनेजर सतीश अहिरे, महाराष्ट्र सरकारचा आण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते समाजसेवक सुनिल सकट, समाजकल्याण विभागाचे अधिकारी शिवाजी हंगे, केव्हीके रेडीओ स्टेशनच्या केंद्र संचालिका गायत्री म्हस्के, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडूरंग शेलार, कायदे सल्लागार सुहास पाटील, महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे हे प्रमुख अथिती म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
समाजाच्या वंचित घटकांना आंतरराष्ट्रीय व्यासपिठ उपलब्ध करून देण्यात वर्ल्ड पार्लमेंट नेहमी अग्रेसर असून अनेक आयएएस, आयपीएस, न्यायाधिश, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते, गिर्यारोहक, खेळाडू, साहित्य, शिक्षक, शास्त्रज्ञ, रक्षा – सुरक्षा विभाग, आर्थिक तसेच सर्वच क्षेत्रातील प्रतिभवंताना सन्मानित केले असून कर्करोग, कुष्ठरोग, नेत्ररोग विकारांसाठी शिबीरे, रॅलीज आयोजित केले आहेत. साहित्य, बाल अनाथश्रम, महिला – पुरुष अनाथ व्यक्ती, व्यसनमुक्ती, अत्याचार विरोधी क्षेत्रातही संस्थेचे कार्यं स्पृहणीय आहे.

तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *