दस्केबर्डी गावात सत्यशोधक समाज संघ शाखेचे उद्घाटन !…  सत्यशोधक समाज संघाचे कार्य घरा- घरात पोहोचविणार : डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )
1 min read

दस्केबर्डी गावात सत्यशोधक समाज संघ शाखेचे उद्घाटन !… सत्यशोधक समाज संघाचे कार्य घरा- घरात पोहोचविणार : डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )

Loading

दस्केबर्डी गावात सत्यशोधक समाज संघ शाखेचे उद्घाटन !…

सत्यशोधक समाज संघाचे कार्य घरा- घरात पोहोचविणार : डॉ. सुरेश झाल्टे ( सचिव सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )

प्रतिनिधी – पी डी पाटील सर

चाळीसगांव – दस्केबर्डी ता.चाळीसगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९८ वी जयंतीचे औचित्य साधून दस्केबर्डी येथे सत्यशोधक समाज संघाची शाखा उद्घाटन दि.११ एप्रिल रोजी संध्याकाळी ठिक ७ वा. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सदर शाखेचे उद्घाटन सत्यशोधक समाज संघाचे प्रदेश सचिव मा. डॉ.सुरेश झाल्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष कैलास जाधव, विश्वस्त भगवान रोकडे व चाळीसगाव तालुकाध्यक्ष तथा विधीकर्ता भगवान बोरसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात फटाकेंच्या आतिषबाजीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सत्यशोधक भगवान बोरसे सरांनी केले तर मान्यवरांचे गुलाबपुष्प व महापुरुषांचे पुस्तकं भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तद्नंतर डॉ.सुरेश झाल्टे सर यांनी प्रबोधन पर आपले महापुरूषांचे ज्वलंत विचार मांडले. नंतर जिल्हाकार्यध्यक्ष कैलास जाधव यांनी सत्यशोधक समाज संघाची धेय उदिष्ट कार्यपद्धती सांगीतली संघाची कार्यकारणी त्या ठिकाणी विविध पद देऊन जाहीर करण्यात आली आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्यशोधक समाज संघाचे काम करण्याचे आणि शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून घरा घरात प्रचार प्रसारक करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पी व्ही मोरे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी दस्केबर्डी येथील शाखा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *