*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
![]()
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
जळगांव प्रतिनिधीए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.श्रीमती.प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे यांच्या शुभ हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रणिता झांबरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित आणि वंचित घटकांच्या उध्दारासाठी केलेले कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून अभिवादन करण्यात आले. सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


