मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर.
![]()
मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.
*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर.
ठाणे:कल्याण
( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांचा कडून ” *समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मनिलाल शिंपी यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय असून, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी भागात,गरजू , आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षनिक साहित्य, विविध समस्या मधे मदत उपलब्ध करून देणे, ऊसतोड कामगार,वीटभट्टी कामगार, यांना रेशन,ब्लँकेट, कपडे, असे साहित्य वाटप करणे, रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघाचा माध्यमातूनएव्हरी संडे रोटी डे हा उपक्रम दर रविवारी कातकरी पाड्यात, वीटभट्टीवर कामगारांना मिष्टान्न भोजन , कपडे, देऊन मानवसेवा ग्रुपची सेवा सुरू आहे,दरवर्षी नंदुरबार,धुळे, जळगाव, व नाशिक जिल्ह्यातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य,स्कूल ड्रेस,तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन, बूट,असे साहित्य वाटप करण्यात येते, वर्षभर प्रत्येक सणासुदिला , अनाथ आश्रम,वृद्धाश्रम,आदिवासी पाड्यावर लेडीज एक्सप्रेस ग्रुप,रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, समाज कल्याण न्यासचे महाराष्ट्र राज्य प्रमुख धर्मसेवक सोन्याभाऊ पाटील यांच्या सहकार्याने मानवसेवा करण्याची संधी मिळत आहे, मी फक्त पोस्टमन म्हणून काम करत असतो असे मत समाजरत्नं पुरस्कार स्वीकारताना डॉ. मनिलाल शिंपी यांनी व्यक्त केले.
लक्ष्मी शिक्षण प्रत्येक वर्षी लक्ष्मी शैक्षणिक संस्था शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने
यावर्षी आदर्श मराठी शाळा
इंग्रजी संभाषण स्पर्धा
निबंध स्पर्धा
इत्यादी आयोजित करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ दादर पश्चिम येथील प्रभादेवी रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पुरस्कृत, पू.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सभागृहात आयोजित करण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक, उदार आणि समाजसेवी दानशूर व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त थोर समाजसेवक नानजीभाई हिमजी ठक्कर, ठाणावाला यांचा हस्ते शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य कमेटीचे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती आणि संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील गरजू लोकांना, व गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षनिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आलेले महाराष्ट्र भूषण, दानशूर व्यक्तिमत्व,यांनी सत्कार समारंभाचे कौतुक करताना बोलताना सांगितले की आज मला खरोखर खूप आनंद होत आहे,माझाकडून गुरुजनांचा सत्कार होत आहे हे माझे खूप मोठे भाग्य आहे,शिक्षक म्हणजे मातृदेवता आहे,महाराष्ट्रात मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे, मराठी शाळेचा निकालाचा दर्जा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी माझाकौन पाहिजे ती मदत उपलब्ध होईल,संपूर्ण महाराष्टील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षनिक साहित्य देखील देण्यासाठी मी तयार आहे, परंतु प्रत्येक शाळेचा निकालाचा उच्चांक वाढला पाहिजे,मी रस्त्यावर फुटपाथवर राहिलो आहे, परमेश्वराने मला इतके दिले की मागायची गरज भासत नाही,माझाकडून परमेश्वर दान करून घेत आहेत. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे कधीही या रिकाम्या हाती पाठवणार नाही असे आव्हान केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,उद्योजक समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत सोरे, पोलिसपाटील संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे,उद्योजक समाजसेवक डॉ.किशोर अढळकर, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर, आर एस पी ठाणे चे सल्लागार समाजसेवक, श्री.माणिक पाटील व संकल्प इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष डॉ.राज परब, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे अध्यक्ष समाजसेवक श्री. करसन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रभारी प्राचार्य सचिन ठाकरे,प्रा. आर आर कसबे,प्रा.दयानंद कांबळे, प्रा.विशाल सोनवणे, प्रा.दळवी सर, प्रा.माधव कांबळे,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.हर्षल शेट्टे, महाविद्यालयाचे ऑफिस मॅनेजिंग डायरेक्टर श्री.रुपेश तरे, सौ.सोनाली पवार, श्री.विनायक ढोबळे यांच्याकडून डॉ. मनिलाल शिंपी यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष, श्री.संजय शेंडे साहेब,
ऊपाध्यक्ष श्री. पी एस महाजन सर, आर एस पी नागपूर चे महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार ॲड.डॉ.के.डी.
पाटील,यांच्याकडून विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनिलाल शिंपी यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री.संजय मराठी,श्री.ज्ञानेश्वर महाजन,श्री.मारुती जाधव,श्री.दत्तात्रय सावंत,श्री.सुनिल बडगुजर, श्री.दत्तात्रय थोरात,श्री.दत्तात्रय बोराटे,यांच्यासह श्री. सुनिल आहेर सर विशेष परिश्रम घेतले.
365 दिवस शाळा चालवणारे व शाळेसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनमोल योगदान देणारे शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे मानकरी ,केशव गावित हिवाळे गाव त्र्यंबकेश्वर,राजेंद्र प्रत्येकी सर चंद्रपूर
संतोष शिंदे जुन्नर पुणे प्रथम क्रमांक.
आदर्श मराठी शाळा मुंबई .
स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर
श्री आप्पासाहेब वीरा शेळके मुख्याध्यापक
द्वितीय क्रमांक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय प्रतीक्षा नगर
ओंबासे.
तृतीय क्रमांक सेवा सदन सोसायटीचे हायस्कूल ग्रँड रोड मुंबई
मुख्याध्यापिका
आदर्श मराठी शाळा मुंबई उर्वरित
प्रथम क्रमांक
मा.रा. सारडा कन्या विद्यालय नाशिक
द्वितीय क्रमांक
ओंकार विद्यालय संभाजीनगर मुख्याध्यापक ओंकार सर
तृतीय क्रमांक
जिल्हा परिषद आदर्श शाळा भादा लातूर
गुरव मॅडम ,
इंग्रजी संभाषण स्पर्धा मराठी माध्यम मुंबई
प्रथम क्रमांक डॉक्टर संदीप माने मुलुंड विद्या मंदिर मुलुंड मुंबई ,
द्वितीय क्रमांक श्री मिलिंद जगताप सर साने गुरुजी विद्यालय दादर,
तृतीय क्रमांक : श्री. प्रमोद माधव नेहते यशवंत विद्यालय प्राथमिक विभाग उल्हासनगर ,
उत्तेजनार्थ बक्षिसे
अनंत शिंपी आयइएस राजा शिवाजी विद्यालय दादर मुंबई,उषा विटे मॅडम
न्यू इंग्लिश हायस्कूल वसई ,
सौ कल्पना पाटील डी एस हायस्कूल सायन मुंबई.
सौ शुभदा चव्हाण ज्ञानविकास संस्थेचे विद्यालय कोपरखैरणे नवी मुंबई ,
श्री. रवींद्र सोनार सर गौरी दत्त विद्यालय सायन मुंबई,
इंग्रजी संभाषण स्पर्धा मुंबई उर्वरित
प्रथम क्रमांक
जिल्हा परिषद शाळा जावडे लांजा रत्नागिरी
सौ. प्रिया जयराज मांडवकर,
द्वितीय क्रमांक
सौ. मनीषा शिवशरण बडदाळ पर्यवेक्षिका कॅम्प एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय निगडी पुणे .
तृतीय क्रमांक
श्री. दीपक गंगावणे सर सिन्नर भूषण सूर्यवंशी गडाख शैक्षणिक संकुल पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक.
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढीलप्रमाणे देण्यात आली आहेत.
श्रीमती संगीता विष्णू गोसावी
जिल्हा परिषद शाळा शिरवाडे वणी नाशिक, खुशालुद्दीन उस्मान शेख
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळी वस्ती तरंगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर
सौ. प्राजक्ता पाकळे एन.आर.सी स्कूल, मोहने आंबिवली,
श्री. सुनील तिवडे सर मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय नांदेड
श्री. विभूती नारायण हायस्कूल बोरिवली दक्षिण मुंबई.
इंग्रजी संभाषण स्पर्धा उर्दू माध्यम
प्रथम क्रमांक,अल्फलाह मालाड स्कूल,
द्वितीय क्रमांक
अंजुमन जमला बेगम स्कूल,तृतीय क्रमांक इला सर्वट स्कूल,उत्तेजनार्थ बक्षीस
1. अलफलाह मालवणी,मालाड मालवणी,2. अंजुमन अल्लाना गर्ल्स हायस्कूल,कुर्ला वेस्ट, याप्रमाणे मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्था व शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा मदतीला तत्परतेने धाऊन जाणारे, मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेले शेंडगे सर यांचा संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

