जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान**
1 min read

जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान**

Loading

**जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान**

जळगाव, 13 एप्रिल (रविवार) – टी.एन. हेल्प मल्टीपर्पज सोसायटी, यावल, जि. जळगाव प्रस्तुत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 यावर्षी वितरण करण्यात आला. हा समारंभ रविवारी सकाळी 10 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्ष सौ. शुभांगी ताई पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार, श्री अशोक प्रभाकर मदाने, श्री तुकाराम केशव पाटील आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये अमळनेर येथील श्री एन.टी. मुंदडा विद्यालयाच्या शिक्षिका सौ संगीता विलास बाविस्कर, मारवड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सतीश हरलाल पारधी आणि श्री. शंकरराव साहेबराव बोरसे यांचा समावेश आहे. या ठिकाणी सौ. शुभांगी ताई पाटील, Adv. श्री विवेक सूर्यवंशी आणि श्री दिनेश साळुंखे सर यांनी मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *