ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :* महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण –
![]()
*ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :*
महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण –
पुण्याची १७ वर्षाची कुमारी ऋतुजा संदीप वऱ्हाडे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय संरक्षण परीक्षा कोर्से १५४ च्या निकालात भारतात मुलींमध्ये प्रथम (AIR 1) Girls आणि सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक (AIR 3) overall मिळवून इतिहास घडविला आहे.
*आतापर्यंत भारतात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारी महाराष्ट्रातील ऋतुजा ही एकमेव मुलगी आहे.* ही प्रत्येक मराठी मनासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुलींसाठी गौरवाची बाब आहे!
ऋतुजा चा हा प्रवास दृढनिश्चय एकाग्रता आणि लहानपणापासून जोपासलेल्या स्वप्नाचा आहे.पुण्यात जन्मलेली आणि वाढलेली ऋतुजा चे कुटुंब साधे आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचे आहे -तिचे वडील श्री संदीप रामभाऊ वऱ्हाडे हे नामांकित इंजिनीरिंग महाविद्यालयामध्ये (PICT) प्राध्यापक आहेत तर आई सौ जयश्री संदीप वऱ्हाडे गणिताची
शिक्षिका आहे . ऋतुजाला लहानपणापासून गणवेशाचे (Uniform) आकर्षण होते तिने लहान असताना सिंघम हा सिनेमा कमीतकमी दहा ते बारा वेळा बघून त्यातील संवाद पाठ केले होते.पण नववीत असताना तिच्या आयुष्यात एक निर्णायक संधी आली जेव्हा *भारत सरकारने प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकादमीचे प्रवेशद्वार मुलींसाठी उघडले*, तेव्हा ऋतुजाने आपले ध्येय निश्चित केले आणि मागे वळून पाहिले नाही.
एक उत्कृष्ट्य विद्यार्थिनी म्हणून ऋतुजाने विज्ञान ऑलिंपियाड तसेच राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र तिची प्रतिभा फक्त अभ्यासापुरती मर्यादित नाही — ती एक प्रशिक्षित हार्मोनियम वादक आणि गायिका देखील आहे, ज्यामुळे तिचे बहुपरिमित व्यक्तिमत्व दिसून येते.
एनडीए प्रवेश परीक्षा देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, विशेषतः मुलींसाठी — यंदा १.५ लाखांहून अधिक मुलींनी केवळ २७ जागांसाठी स्पर्धा केली होती.
ऋतुजा चे दहावीपर्यंचे शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव इथे झाले असून तिला दहावीला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. नंतर ११ आणि १२ साठी तिने यशोतेज अकादमी पुणे इथे प्रवेश घेतला.यशोतेज अकादमी चे संचालक श्री तेजस पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले.
तिने आपल्या जिद्दीने, कठोर परिश्रमाने आणि ध्येयवेड्या मनाने हे यश प्राप्त करून “मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत” हे सिद्ध केलं आहे. तिचा हा यशस्वी प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल.
“यश हे नशिबावर नव्हे, तर न थकता केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं.”
ऋतुजाच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचा, शिक्षकांचा व तिच्या कठोर मेहनतीचा मोलाचा वाटा आहे.
यशोतेज अकादमी चे प्रमुख श्री. तेजस पाटील सर आणि त्यांची सहचारिणी सौ.प्राची पाटील मॅडम यांनी खूप लहान वयात शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठें साम्राज्य उभारले आहेत त्यासाठी त्यांना त्याचे आई वडील श्री.पद्माकर पाटील सर आणि सौ.विद्या पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या अकादमी मधून दरवर्षी बरेच विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अकादमी इथे प्रवेश संपादन करतात. यशोतेज अकादमी मध्ये विद्यार्थी इयत्ता ११ ला ऍडमिशन घेउ शकतो इथे मुले आणि मुलींसाठी हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा आहे.
सर्व विद्यार्थ्यांना आणि अकादमीच्या चमूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
ऋतुजाचे हे अद्वितीय यश केवळ तिचा वैयक्तिक विजय नसून देशभरातील असंख्य तरुणींना सशस्त्र दलांमधून देशसेवेची स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देणारे आहे.
ऋतुजा तुझ्या या असामान्य कामगिरीबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील सैनिकी सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा!
*तू भारतमातेची खरी वीरपुत्री आहेस.*
जय हिंद!

