सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न , 14 एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा, अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी
1 min read

सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न , 14 एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा, अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी

Loading

सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न ,
14 एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा, अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी

अमळनेर प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव निमित्त आई जिजाऊ अभ्यासिका, अमळनेर यांचा तर्फे दि .10 एप्रिल 2025 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,
स्पर्धेला 250 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होते. सदर स्पर्धा आयोजन, संयोजन कामी विशाल घिसाडी , गौरव वानखेडे, शशिकुमार परदेशी, हेमंत बडगुजर यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करियर मार्गदर्शन दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी 9.30वा. आई जिजाऊ अभ्यासिका, असीमजी प्रेमजी कॉम्प्लेक्स अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवर अतिथी यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ-दिनांक -14 एप्रिल 2025
वेळ -9.30 सकाळी,ठिकाण – आई जिजाऊ अभ्यासिका, आसिमजी प्रेमजी कॉम्प्लेक्स,अमळनेर जि.जळगाव
अधिक माहितीसाठी संपर्क- 90220 62421 साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *