अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!
1 min read

अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!

Loading

अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!

 

 

अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील हिन्दी अध्यापक मंडळाच्या सदस्या श्रीमती प्रतिभा जाधव मॅडम यांना पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित हिंदी विषयाच्या 3 दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाल्याने मंडळात आनंदाचे वातावरण आहे. 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेल्या या कार्यशाळेत त्यांनी यशस्वीरित्या सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत झाले.
ही कार्यशाळा शिक्षण क्षेत्रात प्रतिभा जाधव मॅडम यांच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ते इतर अध्यापकांसाठी प्रेरणादायक ठरेल, असे मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “प्रतिभा जाधव मॅडमने या प्रशिक्षणात भाग घेऊन संधीचे सोनं केले,” असे अध्यक्ष व सचिव त्यांनी सांगितले.
हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर, सचिव दिलीप पाटील, आणि कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक जेष्ठ सदस्यांनी प्रतिभा मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जिल्हा कार्यकारणीचे सदस्य एन.आर चौधरी, मार्गदर्शक दिपक पवार, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,सदस्य डॉ किरण निकम,प्रदीप चौधरी, सोपान भवरे, मुनाफ तडवी,सुनील पाटील,
योगेश्वरी पाटील मॅडम, श्रीमती कविता मनोरे मँडम, श्रीमती मंगला चव्हाण मँडम,प्रतिभा आहिरे मँडम प्रशांत वंजारी,तसेच इतर सदस्यांनीही या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
श्रीमती प्रतिभा जाधव मॅडम यांचे हे काम निश्चितच शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायक उदाहरण ठरेल आणि भविष्याच्या पिढ्यांसाठी एक नवीन दिशा प्रदान करेल!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *