कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न.
![]()
कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता
नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न.
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)नवी मुंबई,बेलापूर, मुख्यालयात
महानगर पालिकेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय , कार्यसम्राट, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे ,
आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अति.आयुक्त श्री. सुनील पवार,
शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे मॅडम,
नवी मुंबई महानगरपालिकेचे
शिक्षण शिक्षक अधिकारी सौ.अरुणा यादव
यांच्या सोबत शिक्षकांची बैठक घेऊन शिक्षण सेवक शिक्षकांना कायम करणे, ठोक मानधनावर काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना कायम करणे, बालवाडी शिक्षकांचे प्रश्न, व अन्य शिक्षकांच्या विविध विषयावर सखोल चर्चा करून आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी सर्व फाईलवर समोरासमोर विस्तृत चर्चा करून मागणी केली ,त्यानुसार सर्व प्रस्ताव शासनास पाठवून सर्व शिक्षकांना कायम करण्याची करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल ,असे आश्वासन माननीय आयुक्त
श्री.सुनील पवार साहेब यांनी दिले
या संदर्भात मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ,
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सदर शिक्षकांना कायम करण्यासंदर्भात लक्षवेधी घेऊन विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.
अध्यक्ष ,बेलापूर विभाग महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे विकास वाघमारे,
बेलापूर विभाग कोषाध्यक्ष सचिन बुधकर यांच्यासह
मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व शिक्षक बांधव,महिला भगिनी शिक्षिका यांनी धन्यवाद व्यक्त केले.

