प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर
1 min read

प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर

Loading

प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर

धुळे- येथील प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या कवितासंग्रहाला इंदौर (मध्यप्रदेश) येथील कवि वसंत राशिनकर काव्यसाधना अखिल भारतीय सन्मान २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘जंगल सहल’ या लोकप्रिय कवितासंग्रहाला अखिल भारतीय काव्यसाधना सन्मान २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे इंदौर येथील ‘आपले वाचनालय’ चे सचिव तथा प्रसिद्ध साहित्यिक संदीप राशिनकर व अध्यक्ष सचिन यवतीकर यांनी कळविले आहे.
यापूर्वी प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या कवितासंग्रहाची शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत निवड झालेली असून कवी प्रेमचंद अहिरराव यांच्या कवितांचा समावेश महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या क्रमिक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात झालेला आहे. शिक्षण, साहित्यलेखन, दुर्गसंवर्धन, व्याख्यान, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या प्रेमचंद अहिरराव यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून
साहित्य पुरस्कारात अत्यंत मानाचा समजला जाणारा कवी वसंत राशिनकर अखिल भारतीय काव्यसाधना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *