विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘मसाप’कडून सन्मान!  अमळनेर येथे झाली ‘मसाप’ ची सर्वसाधारण सभा
1 min read

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘मसाप’कडून सन्मान! अमळनेर येथे झाली ‘मसाप’ ची सर्वसाधारण सभा

Loading

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘मसाप’कडून सन्मान!

अमळनेर येथे झाली ‘मसाप’ ची सर्वसाधारण सभा

अमळनेर – येथील महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) अमळनेर शाखेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक साहित्यिक राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंत व यशवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
शाखेचे अध्यक्ष नरेंद्र निकुंभ हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा प्रतिनिधी माजी प्राचार्य तानसेन जगताप यांची विशेष उपस्थिती होती. ‘मसाप’ चे कार्याध्यक्ष रमेश पवार, कोषाध्यक्ष संदिप घोरपडे, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदीनिवड झालेले प्रा.डॉ धीरज वैष्णव, ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा डॉ रमेश माने, दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित झालेल्या सुनिता पाटील, पाठ्यपुस्तक निर्मितीत योगदान देणारे उपक्रम शील शिक्षक रत्नाकर पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झालेल्या भारतीय सोनवणे तसेच व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झालेले उमेश काटे यांचा विशेष सत्कार ‘मसाप’चे जिल्हा प्रतिनिधी माजी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत शोकप्रस्ताव,अभिनंदन ठराव,मागील वर्षाचा जमा – खर्च व कार्यवृत्त सादर करण्यात आले. आगामी काळासाठी नवीन कार्यकारी मंडळ निवड करणे या विषयावर तानसेन जगताप यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यानी सांगितले की, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पर्यायाने केंद्र शासनाकडून भाषा समृद्धीसाठी भरघोस निधी दिला जाणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून मोठे भरीव कार्य करावे असे आवाहन केले. तसेच यावेळी निवड समिती तयार करण्यात आली. नरेंद्र निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, गट विकास अधिकारी संजय सोनवणे, प्रा शाम पवार, एस डी देशमुख, बन्सीलाल भागवत, गोकुळ बागुल, भाऊसाहेब देशमुख, शरद सोनवणे, माधुरी पाटील, संजय चौधरी,निरंजन पेंढारे आदींसह ‘मसाप’ चे सभासद उपस्थित होते. प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. तर दिलीप सोनवणे यांनी आभार मानले.
—-

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *