कन्या “पल्लवी” च्या स्मृतिदिनी अहिरराव दांपत्य वाहते दरवर्षी सांगितिक श्रद्धांजली…!*
1 min read

कन्या “पल्लवी” च्या स्मृतिदिनी अहिरराव दांपत्य वाहते दरवर्षी सांगितिक श्रद्धांजली…!*

Loading

कन्या “पल्लवी” च्या स्मृतिदिनी अहिरराव दांपत्य वाहते दरवर्षी सांगितिक श्रद्धांजली…!*

धुळे प्रतिनिधी
धुळे_येथील रविंद्र अहिरराव व आशा अहिरराव हे दांपत्य आपली स्वर्गवासी मुलगी पल्लवी च्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी “स्वरांजली सांगितिक कार्यक्रम” आयोजित करून आपल्या स्वर्गवासी “संगीत विशारद” मुलीला अनोखी श्रद्धांजली वाहून तिचा छंद हा ह्या कार्यक्रमाच्या रूपाने जोपासताना पहायला मिळतात,गाण्याचा प्रचंड छंद,मधुर आवाज,उत्तम हस्ताक्षर,पदवीधर,आकाशवाणी तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात पल्लवी ने केलेल्या सादरीकरणाने अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मुलीचे आकस्मित निधन झाल्यानंतर अहिरराव दांपत्य दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात.
*ह्या वर्षी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य बी बी महाजन सर हे होते,ह्या पल्लवी संगीद अकादमी चे विद्यार्थी प्रणव पाटील,विजय नन्नवरे,पंडितराव ठाकरे,श्रीरंग मसने,संतोष एंडाईत,विजय माळी,हर्षिका कापडे,कविता पाठक,विभूती जोशी,मनस्वी पाटील,संध्या गायकवाड,कृष्णा गायकवाड,तीर्थराज पवार,भावना पाटील,हर्षदा बोरगावकर,सीमा ठाकूर,जय उफाडे,आर्या आहेर,परीस पाटील,आकाश उफाडे,निवृत्ती सोनवणे, आशुतोष पुरकर,नंदकुमार कुलकर्णी, सुखश्री बोरगावकर यांनी रागयमन,चारुकेशी,भैरवी, भीमपलासी,देस,खमाज,दुर्गा इत्यादी रागांवर आधारित गायन केले तसेच काही विद्यार्थ्यांनी भावगीते,भक्ती गीते व चित्रपटांची गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ह्या कार्यक्रमाला माजी खा.डॉ.सुभाष भामरे,मा.जि.प सदस्य बापू खलाणे,बी एन बिरारी,माजी नगरसेवक सुभाष जगताप,माजी नगरसेविका भारती माळी,माजी नगरसेवक मिलिंद सोनवणे,विश्राम बिरारी सर,प्राचार्य बी एच जाधव,प्राध्यापक अण्णा माळी,देवेंद्र बापू पाटील,मुन्ना वाडीले, प्राचार्य व्ही बी पाटील,उदय अण्णा महाजन,सतीश दादा पाटील, दिनेश बापू माळी, प्रकाश बापू माळी,कैलास बागुल,श्याम महाजन,पंकज महाजन उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल माळी यांनी तर सूत्रसंचालन हर्षदा बोरगावकर यांनी केले,यशस्वीतेसाठी मनोज बोरगावकर,मयूर वराडे,भगवान माळी,किरण माळी,मयूर महाजन,नितेश कैलास बागुल, कुणाल सजन मोरे,परीक्षित अभिजीत पाटील,प्रणव महाजन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *