आदित्य पाटीलचे एम बी बी एस मध्ये प्रथम श्रेणीत यश!
1 min read

आदित्य पाटीलचे एम बी बी एस मध्ये प्रथम श्रेणीत यश!

Loading

आदित्य पाटीलचे
एम बी बी एस मध्ये प्रथम श्रेणीत यश!

अमळनेर प्रतिनिधी
टाकरखेडा, ता. अमळनेर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री मुरलीधर उत्तम पाटील यांचे नातू आणि श्री शिवाजी हायस्कूल तांबेपूरा अमळनेर येथील पर्यवेक्षक श्री एस एम पाटील यांचे चिरंजीव कु. आदित्य सुधाकर पाटील यांनी एम बी बी एस च्या शेवटच्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
मुंबईतील द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आर एन कूपर मेडिकल कॉलेजमधून त्यांनी ही पदवी संपादन केली.
यांच्या या यशामुळे त्याला गावकऱ्यांपासून शाळेतील सहकार्‍यांपर्यंत आणि नातेवाईक मित्रमंडळींना अभिमानाची अनुभूती झाली आहे. त्यांच्या मेहनतीला मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे, ज्यामुळे कु. आदित्य पाटीलचा हा यशस्वी प्रवास इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *