५वे अहिराणी साहित्य संमेलन: उत्साही सांगता आणि श्रीमती शुभांगीताई पाटील यांचे विशेष उपस्थिती
1 min read

५वे अहिराणी साहित्य संमेलन: उत्साही सांगता आणि श्रीमती शुभांगीताई पाटील यांचे विशेष उपस्थिती

Loading

५वे अहिराणी साहित्य संमेलन: उत्साही सांगता आणि श्रीमती शुभांगीताई पाटील यांचे विशेष उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी

५व्या अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात ३० तारखेला अत्यंत उत्साहात झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ तारखेला अनेक कवींच्या कवितांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला. यात अहिराणी झटका, एकपात्री नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कथाकथनाचा आस्वाद घेण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक कवींनी व नाटककारांनी अहिराणी भाषेचा गोडवा सांगितला, तर त्यांनी अहिराणी भाषेच्या विविध वैशिष्ट्यांबाबत आपल्या विचारांची देवाणघेवाण केली.

याप्रसंगी श्रीमती शुभांगीताई पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आयोजकांशी आणि अनेक शिक्षकांशी चर्चाही केली. त्यांचा सत्कार आदरणीय श्री संदीपजी घोरपडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदरणीय श्री विवेक सूर्यवंशी सर, दिनेश साळुंखे सर, श्री संदीप पाटील सर, श्री बन्सीलाल खलाणे, श्री आनंद धनगर सर, आणि श्री बापूराव ठाकरे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाने साहित्यिक संवाद साधण्याची एक अविस्मरणीय संधी दिली आणि अहिराणी भाषेच्या समृद्धतेला आणखी एक वेगळा उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *