विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न!**
1 min read

विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न!**

Loading

विलासराव पाटील यांच्या षष्ठब्दी पूर्तीचा गौरव: धुळे येथे भव्य बैठक संपन्न!

धुळे प्रतिनिधी
दिनांक 29 मार्च 2025 वार शनिवार रोजी विलासराव पाटील गौरव सोहळा निमित्ताने बैठक सातपुडा सभागृह सातपुडा विद्यालय विद्यानगर देवपूर धुळे येथे संपन्न झाली . या बैठकीला समितीचे अध्यक्ष श्री अविनाश जी पाटील तसेच गौरव समितीचे कार्याध्यक्ष श्री भैय्यासाहेब एस टी पाटील आणि एडवोकेट सुधीरजी जाधव (उपाध्यक्ष गौरव समिती ) त्यांच्या समवेत अनेक मान्यवर व श्री विलासरावजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या प्रसंगी आदरणीय भैय्यासाहेब एस टी पाटील ( कार्याध्यक्ष गौरव समिती ) यांनी समिती गठित करण्यासंदर्भात म्हणाले की विलासराव हे शिक्षक आहेत त्यांचे कार्य शिक्षणासंबंधी असल्याने त्यांचे कार्य पाहून समितीने काम करावे . तसेच कार्यक्रमाची तारीख व्यवस्थित पहावी . कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याला पैसा उभारावा लागतो . यासाठी निधीमध्ये स्व इच्छेने व स्वतः विलासरावांचे योगदान महत्त्वाचे राहील . तसेच निधी संकलनासाठी कोणाच्या शब्दाने पैसा मिळेल असे माणसे हेरून समिती बनवावी . आणि विलासरावांच्या संपर्कातील धुळे शहरातील अनेक संस्थां पदाधिकारी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची नावे त्यांनी समितीला कळवावे . कार्यक्रमासंदर्भात वेळेचे बंधन ठेवावे . कार्यक्रमाचा विषय ठरवावा .बाहेरगाव च्या पाहुण्यांची व्यवस्था कशी करावी याचे नियोजन करावे . आम्हाला केव्हाही बोलवा आम्ही मदतीस तत्पर राहू .जे माणसे वर्किंग आहेत त्यांना गोळा करावीत . पुन्हा एकदा तीन-चार दिवसात आढावा बैठक लावावी . महत्त्वाच्या कमिट्या तयार करून जबाबदारी वाटून द्यावे .असे त्यांनी सुचविले .यानंतर श्री संजय जी पवार सर म्हणाले की विलासराव पाटील यांच्या संस्थेतील व कार्यरत शाळेतील माजी विद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा व ते कोणकोणत्या क्षेत्रात आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांची मदत घ्यावी . यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमाव्यात ‘ जबाबदाऱ्या द्याव्यात . तसेच जाहिराती संदर्भात संबंधितांची यादी तयार करून निधी संकलनाची त्यासंबंधी जबाबदारी देण्यात यावी . समितीचे सदस्य माननीय भाऊसाहेब मिलिंद जी सोनवणे यांनी सांगितले की या समितीत गौरविका हे नाव किंवा गौरव विशेषांक हे नाव द्यावे . श्री विलासराव पाटील यांचा आईचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा निमित्ताने त्यांची ग्रंथ तुला करावी व यावेळी जी पुस्तके आलेली असतील ते गरजूंना वाटप करावेत .
तसेच कार्यक्रमाचा बजेट ठरवावा .बाहेर गावातील पाहुण्यांची व्यवस्था आणि हॉटेल संदर्भाचे मॅनेजमेंट ची जबाबदारी द्यावी . कार्यक्रमासाठी निधीचे टारगेट लक्षात घेऊन निधी संकलन करावे .कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी . तसेच मुख्य कार्यक्रमात अध्यक्ष भाषणानंतर सत्काराचा कार्यक्रम ठेवावा .याबाबत स्ट्रीक सूचना द्याव्यात . कार्यक्रमात कोणीही सत्कार करू नये अशा माफक सूचना दिल्या . यावेळी माननीय उदयजी तोरणे यांनी सांगितले की सत्कारासाठी कोणीही फुलं हार बुके न देता प्रत्येकाने पुस्तके भेट द्यावेत हे त्यांनी सांगितले . यानंतर राजूभाऊ पाटील देवगाव देवळीकर म्हणाले की विलासराव हे आमच्या गावाचे भूषण व आयडॉल आहेत त्यांनी समाजातील तळागाळातील मुलांना मुलींना अनेक प्रकारे मदत केलेली आहे .सर्वांशी त्यांनी मैत्री ठेवली आहे . तसेच संदीप माळी म्हणाले की ठराविक काळानंतर आढावा बैठक घ्यावी .तसेच सोशल मीडिया व्हाट्सअप यावर बैठकीचे वृत्तांकन टाकावे .या कार्यक्रमात सिनेट सदस्य माननीय नितीन ठाकूर म्हणाले की सरांची ग्रंथ तुला करावी . व ती पुस्तके गरजूंना किंवा संस्थेला शाळेला वाटावीत . कार्यक्रमात विलासरावांची मुलाखत घेऊन कार्यक्रमाचा दर्जा वाढवावा . इतर नियोजन समिती स्थापन करावी .या कार्यक्रमात आदरणीय किशोर माळी गुरुजी म्हणाले की विलासराव पाटील सरांची लहानपणापासून ते या क्षणापर्यंतची डॉक्युमेंटरी तयार करून कार्यक्रमात पी पी टी स्वरूपात दाखवावी .
यावेळी अनेकांनी देणगी जाहीर केली यात संदीप माळी यांनी ५१०० रुपये किशोर माळी यांनी 2100 रुपये व श्री आर सी सोनवणे भामेरकर यांनी 5001 रुपये देणगी स्वरूपात जाहीर केली . या कार्यक्रमात मनोहर चौधरी ( माध्य शिक्षक पतसंस्था व्हाईस चेअरमन ) म्हणाले की निधी संकलन कसे करावे याचे लवकर नियोजन करावे .तसेच समितीचे सदस्य आदरणीय श्री व्ही टी गवळे ( प्राचार्य जय हिंद शाळा )सर यांनी कार्यक्रमाचा खर्चाचा तपशील व अंदाजपत्रक तयार करावे आणि पुढच्या आठावा बैठकीत मांडावे असे त्यांनी सांगितले .तसेच माळी महासंघाचे श्री हरिश्चंद्र रेंडे सर म्हणाले की सरांचा वाढदिवस ३ मे रोजी असल्याने त्याच दिवशी हा कार्यक्रम घ्यावा असं त्यांनी सांगितले . तसेच आदरणीय दीपक बाविस्कर सर यांनी विलासराव पाटील सरांची जी डॉक्युमेंटरी तयार होईल त्या डॉक्युमेंटरी मध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभेच्छा टाकाव्यात .
तसेच विलासराव पाटील यांनी नुकताच इतर राज्यांचा दौरा केलेला आहे आणि तेलंगणा राज्यातील अभ्यासक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्रा वर धडा अभ्यासक्रमात टाकण्या संदर्भात व भारतरत्न पुरस्कार संदर्भात ठराव तेलगांना राज्य सरकारने तयार करून केंद्रसरकार कडे पाठविण्याची त्यांची मागणी मान्य केल्याने असा इतिहास डॉक्युमेंटरीतून मांडावा असं त्यांनी सुचविले आहे . या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सूचना व समितीला सहकार्य करण्याचे सुचविले आहे यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अविनाशजी पाटील यांनी समितीचे नियोजन करावे .पैसा म्हणजे निधी उभारावा . कार्यक्रम माहिती पुस्तिका तयार करावे . सत्कार समिती बनवावी . निमंत्रण समिती व्यवस्थापन समिती व इतर समिती बनवाव्यात .तसेच सदर कार्यक्रमाचा अपेक्षित खर्च ठरवावा .सरांच्या कार्याविषयी पीपीटी तयार कराव्यात . विलासरावांची प्रकट मुलाखत घ्यावी .
कार्यक्रमाचे वेगळेपण तसेच कार्यक्रमाचा दर्जा कसा उंचावेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले . आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार व मार्गदर्शन एडवोकेट सुधीर जाधव यांनी करून समितीस सर्वतोपरीत आमचे सहकार्य राहील . व विलासरावा चा परिसस्पर्श मैत्रीचा गोतावळा हे पाहून मोठ्या दिमाखदार पणे गौरव सोहळा सर्वच्या मदतीने व साक्षीने साजरा होईल . यासाठी सर्वाचे तन मन धनाने सहकार्य करावे असे त्यांनी सूचित केले . व माझ्या संस्थेत ही बैठक असल्याने सर्वांचे आभार मानले . शेवटी चहा व अल्पोहाराने कार्यक्रम संपन्न झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *