गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची*
1 min read

गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची*

Loading

*गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची*

जळगांव प्रतिनिधी
खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी नववर्षाचे स्वागत वर्गासमोर गुढी उभारून केले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे श्री.एकनाथ पाचपांडे, सौ.सुचिता बाविस्कर यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, फलक लेखन, संदेशात्मक आरास करून या नवीन वर्षात आम्ही शालेय शिस्तीचे पालन करु आईवडील व गुरुजनांचा आदर करून वर्ग व परिसरात स्वच्छता राखून पर्यावरण रक्षण करु.नेहमी खरे बोलू ,आपापसात भांडण करणार नाहीत ,गरजूंना मदत करु,अभ्यास पूर्ण करु पालकांच्या पैशाचा अपव्यय करणार नाहीत असे संकल्प केले. तसेच गुढीपाडवा या सणाचे पौराणिक महत्त्व सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.निर्मल चतुर सर व सौ.पुनम कोल्हे यांनी वर्ग सजावटीचे परिक्षण केले.
प्रथम क्रमांक इ.७ वी अ
व्दितीय क्रमांक इ.८ वी ब
तृतीय क्रमांक इ.५ वी ब
या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटकाविले.कार्यक्रमासाठी श्री चंद्रकांत कोळी, आर.एन. तडवी, विवेक मोरे, मनीषा जयकर, दिपाली खडके, या शिक्षकांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *