वत्साई एज्युकेशन सोसायटीत बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम प्रमाणपत्र कार्यक्रम यशस्वी
1 min read

वत्साई एज्युकेशन सोसायटीत बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम प्रमाणपत्र कार्यक्रम यशस्वी

Loading

वत्साई एज्युकेशन सोसायटीत बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम प्रमाणपत्र कार्यक्रम यशस्वी

अमळनेर प्रतिनिधी
– वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बजाज ऑटो लिमिटेड व टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यकमामध्ये संस्थेच्या इलेक्ट्रिशियन आणि फिटर विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील एकूण 80 उत्साही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला.
हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थ्यांसाठी उत्सवासारखा ठरला, कारण या कोर्स पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना बजाज कंपनीच्या वतीने प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि बॅच बिल्ला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह काहीतरी नवा गती देणारा होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर सचिन करारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्यासह प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, विजय चौधरी सर यांचे सहकार्य आणि योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *