मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी!  80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता!
1 min read

मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी! 80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता!

Loading

मुंदडा नगरात पाण्याचा पुरवठा ठप्प: ठेकेदाराच्या मनमानीवर तातडीने कार्यवाहीची मागणी!

80 फुटी रींग रोडच्या कार्यामुळे पाणी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर लक्ष देण्याची आवश्यकता!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गेल्या एक ते दीड महिन्यापासून 80 फुटी रींग रोडच्या कामासाठी रस्ता खोदून पाईप लाईन वारंवार फोडणे सूरू आहे. तसेच फुटलेल्या पाईप लाईनीत तेच घाण पाणी जाते संबंधित ठेकेदाराच्या भोगळं मनमानी तसेच नियोजन शून्य कारभारामुळे मुंदडा नगर पाण्याच्या टाकीचा पाणी पुरवठा 10 ते 12 दिवसांनी गढूळ दुर्घधी युक्त होतोय संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजना मुळे नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वनवन फिरावे लागत असून मुंदडा नगर पाण्याच्या टाकी वरून 15 ते 20 कॉलनीचा पाणी पुरवठा होतो. तरी नगरपरिषदेने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही न केल्यास आणि असाच 10 ते 12 दिवसानी पाणी पुरवठा केल्यास नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल यांची संबंधितानी नोद घ्यावी असे
मुख्याधिकारी तथा, मुख्य प्रशासक
नगरपरिषद अमळनेर यांना निवेदनाद्वारे मागणी
मा.नगरसेवक कमलबाई पितांबर पाटील व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिंताबर यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *