अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव!  विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम
1 min read

अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव! विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम

Loading

अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव!

विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मुकेश अमृत पाटील यांच्या कल्पकतेमुळे व मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाड्यावरचा चहा’ हा अद्वितीय उपक्रम संपन्न झाला. यामध्ये इ. 8वीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि संस्थाचालकांच्या आशीर्वादाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

 

 

इ. 8वीच्या मराठी अभ्यासक्रमातील ‘पाड्यावरचा चहा’ पाठाचा प्रत्यक्ष कृतीयुक्त अनुभव घेण्यासाठी विद्यार्थिनींनी शाळेच्या मैदानात झाडांच्या आडोशाला साडी व ओढणींच्या साहाय्याने झोपड्या तयार केल्या. यानंतर दगड व विटा आणून चुलही तयार करण्यात आली. विद्यार्थिनींनी निरनिराळे चविष्ठ पदार्थ जसे की भाकरी, पराटे आणि ठेचा स्वतः तयार करून, चहा बनवण्यास प्रारंभ केला.
पातेल्याला बुण लावण्यापासून चहा बनवण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थिनींनी आनंद लुटला. या उपक्रमासहित, संस्थेचे अध्यक्ष आबासो श्री. हेमकांतजी पाटील, सचिव दादासो श्री. संदिपजी घोरपडे व सर्व संचालक मंडळ शाळेत आले आणि विद्यार्थिनींना शाब्बासकी देऊन पाककलेचा आनंद घेतला.

 

 

 

सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही या आनंददायी वातावरणाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाने विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अनुभवात नवा आयाम आणला असून, आनंददायी वातावरणात ‘पाड्यावरचा चहा’ शाळेमध्ये अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *