सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
![]()
सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
शिंदवणे: वाढदिवस साजरे करताना सात्विक कार्ये करावीत. तामसी व राजस कर्मामुळे वाढदिवस साजरा करताना आनंदामध्ये विरजण पडून खरा आनंद हिरावल्या जातो. वास्तविक वाढदिवस म्हणजे आपण या पृथ्वीतलावर जन्माला आलो याचा हा आनंदाचा क्षण असतो. अलीकडे रंगीन संगीन उपक्रमाद्वारे ऐश करून वाढदिवस साजरा करण्यात येतो. वाढदिवसाचा खरा उद्देश म्हणजे वयाची जाण व जबाबदारीचे भान राहणे.जसजशे वय वाढेल तशी तशी वागण्यात ,बोलण्यात ,परिपक्वता येणे गरजेचे आहे. यासाठी लोककल्याणकारी योजना राबवून सात्विक प्रवृत्ती जपून वाढदिवस साजरा करावा.. असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथील पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप व श्री विठ्ठल भवन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. भाऊसाहेब महाडिक हे दैनिक सामनाचे पत्रकार असून लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल जूनियर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख म्हणून काम बघतात .हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघाचे व हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघाचे सचिव म्हणून ही काम ते पाहतात .हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर ,पिंपरी चिंचवड शारीरिक शिक्षण संघटने सचिव राजेंद्र पितळीया,हवेली तालुका उद्धव ठाकरे शिवसेना विभाग शिवसेनेचे विभागप्रमुख कुंजीर पाटील, पत्रकार नितन करडे,जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा मुख्याध्यापक जनार्दन कुंजीर ,डॉ. मनी भाई देसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र भोळे, शिंदवणे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नानासाहेब महाडिक ,रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस टि.के .महाडिक ,श्री छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुल चे संस्थापक अध्यक्ष शरद महाडिक ,व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर समाजाला जाणाऱ्या डाळिंब गावातील डाळिंब येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना अन्नदान करून मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ह भ प सचिन मातेफोड,पत्रकार सुनील तुपे, श्री विठ्ठल देवस्थानचे सचिव एलबी कुंजीर डाळिंब ग्रामपंचायत उपसरपंच व दौंड तालुका शिवसेनाप्रमुख सर्जेराव मस्के ,श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश लेकुळे महाराज, ह भ प काशिनाथ दिवेकर ,इतिहास संशोधक खालील शेख, सहदेव खंडाळे ,पत्रकार अमोल भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

