सन्मान त्यागाचा,सन्मान धैर्याचा,सन्मान कर्तृत्वाचा,सन्मान मार्तृत्वाचा*
![]()
*सन्मान त्यागाचा,सन्मान धैर्याचा,सन्मान कर्तृत्वाचा,सन्मान मार्तृत्वाचा*
जळगाव प्रतिनिधी
खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे पालक शिक्षक संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त एकल माता पालकांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्या.डॉ.शिल्पा बेंडाळे (संचालिका के.सी.ई.सोसायटी जळगाव)
मा.श्री.निरंजन वाणी (उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ)
शाळेच्या मुख्याध्यापिका.श्रीमती. प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून करण्यात आली.
याप्रसंगी सौ.रत्नमाला शिंदे मॅडम यांनी मानपत्राचे वाचन व कविता सादर करुन स्त्रीशक्तीचा जागर केला. सौ.मनिषा जयकर यांनी कवितेतून आईचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व पटवून दिले.
*स्त्री म्हणजेच मात्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व – डाॅ. शिल्पा बेंडाळे*
विद्यालयातील विद्यार्थ्यांना व मातापालक यांना संबोधित करतांना आलेल्या संकटावर वादळांवर सकारात्मकपणे मात करून आपल्या पाल्यांना आदर्श नागरिक घडवा. आई जिजाऊ सारखे संस्कार घडवा.गृहीणी नव्हे तर गृह निर्माते बना आपल्या क्षमता ओळखा इतरांशी तुलना करू नका समाजात आपले स्वतःचे मानाचे स्थान निर्माण करा.असे आवाहन करुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चंद्रकांत कोळी सर यांनी केले.आभार प्रदर्शन श्रीमती.प्रणिता झांबरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी.श्री.डी.ए.पाटील सर,श्री.निर्मल चतुर सर, श्री.रफिक तडवी सर,सौ.मनिषा जयकर, सौ.रत्नमाला शिंदे,सौ
मंगल गोठवाल, श्री.अनिल शिवदे,श्री.चंदन खरे,शुभम तायडे,तुषार सोनवणे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी यांनी परिश्रम घेतले.


