जागतिक महिला दिनानिमित्त: ज्योतीताई राजेंद्र पवार यांचा प्रेरणादायी प्रवास
![]()
जागतिक महिला दिनानिमित्त: ज्योतीताई राजेंद्र पवार यांचा प्रेरणादायी प्रवास
कोणतेही कार्य करत असतांना आत्मविश्वास, जिद्द आणि परमेश्वरावर निस्सीम भक्ती असेल, तर कोणतीही कार्य यशस्वी होऊ शकते. हेच सिद्ध करून दाखवले आहे अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगरातील संत गजानन महाराज मंदिराच्या महिला वारकरी प्रमुख ज्योतीताई राजेंद्र पवार यांनी. ताई संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त असून आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचा अभ्यास वाखाणण्यासारखा आहे.
ताईंसोबत त्यांच्या पती, पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे माजी सभापती व संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार यांचा भक्कम पाठिंबा आहे, ज्यामुळे त्यांनी महिला वर्गांचा गोतावळा निर्माण केला आहे. ग्रामीण व शहरी भागात संत गजानन महाराजांच्या सत्संगात महिलांचा सक्रिय सहभाग असतो, ज्यामुळे त्या अध्यात्मिक शक्तीने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात कार्यरत असतात.
ज्योतीताईंनी अनेक महिलांना संत गजानन महाराजांच्या परिवारात सामील होण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील लोकांचे योगदान घेऊन गजानन महाराज यांच्या भव्य दिव्य मंदीराच्या बांधकामासाठी हातभार लागला आहे..
आज दादासाहेब सोनार नगरमध्ये प्रति शेगाव म्हणून संत गजानन महाराजांचे मंदिर उभे राहिले आहे.
ज्योतीताई या प्रेमळ आहेत आणि सर्वांना आपलंसं करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे, त्यांचा संपूर्ण परिवार संत गजानन महाराजांचा भक्त आहे. त्यांचा मुलगा मोहित आदर्श व आज्ञाधारक मुलगा असून, सुन किरण उच्चशिक्षित आहे, तर मुलीने वकिली व्यवसायात करिअर बनवले आहे.तर जावाई व्यवसायिक आहेत..
स्त्री-पुरुष दोघांचा समान सहभाग असला तरच वारकरी संप्रदायाची समृद्धी होईल, हे ज्योतीताईंनी स्पष्टपणे बिंबवले आहे. त्या महिलांना प्रेरित करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी बळकटपणे काम करत आहेत. त्यांची महिला मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेली दिंडी 2018 पासून स्वतंत्रपणे सुरू असून, यात तालुक्यातील 200 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त ज्योतीताईंच्या उत्कृष्ट कार्यावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न मराठी लाईव्ह न्युजने केला आहे.
ताईसाहेब यांच्यासाठी संत गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य मिळो!
आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
**जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!**
**शुभेच्छुक,**
ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
9860352960

