डांगरीमध्ये कु. दिपाली शिसोदे बिनविरोध सरपंच: उच्चशिक्षित भाऊ-बहिणी करणार गावाचा विकास!**
![]()
**डांगरीमध्ये कु. दिपाली शिसोदे बिनविरोध सरपंच: उच्चशिक्षित भाऊ-बहिणी करणार गावाचा विकास!**
अमळनेर प्रतिनिधी – ग्रामपंचायत प्र. डांगरी येथे कु. दिपाली उदय शिसोदे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. दिपालीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर तिचा भाऊ चि. स्वप्नील उदय शिसोदे विकास सोसायटी प्र. डांगरीचा चेअरमन असून त्याने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे.
हा उच्चशिक्षित भाऊ-बहिणीचा जोडी गावाच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने मोठा महत्वाचा ठरतो. दोघेही आपल्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे गावाच्या नेतृत्वात नव्या दृष्टीकोनाने काम करणार आहेत.
त्यांचे वडील श्री. उदय प्रल्हाद शिसोदे या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत, जे त्यांच्या कुटुंबाची सेवा व संवादाची परंपरा दर्शवितात.
दिपालीच्या सरपंचपदी निवडीमुळे स्थानिक समाजामध्ये मोठा आनंद आणि कौतुकाची लहर आहे. तिच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

