शिक्षकांच्या जुनी पेंशन व इतर मागण्यांसाठी आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार धरणे आंदोलन!
1 min read

शिक्षकांच्या जुनी पेंशन व इतर मागण्यांसाठी आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार धरणे आंदोलन!

Loading

शिक्षकांच्या जुनी पेंशन व इतर मागण्यांसाठी आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार धरणे आंदोलन!

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक व पदवीधर आमदारांनी आज (शुक्रवारी) विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करत त्यांच्या महत्वाच्या मागण्यांसाठी सशक्त आवाज उठविला. या आंदोलनात टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करणे आणि समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करणे यासारख्या मागण्यांचा समावेश होता.
आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले आणि आमदार अभ्यंकर यांसारख्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. आमदार आसगावकर यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे.”
यामुळे शिक्षकोंची वेदना व समस्या अधिक स्पष्ट झाल्या आहेत, आणि संसदीय पातळीवर त्यांचे हक्क हिरावून घेण्यात येऊ नयेत यासाठी ते एकत्र येत आहेत. या धरणे आंदोलनामुळे शिक्षकांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार हे निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *