नाशिकमध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचा धरणे आंदोलन – जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी जोरदार आवाज!**
1 min read

नाशिकमध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचा धरणे आंदोलन – जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी जोरदार आवाज!**

Loading

**नाशिकमध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचा धरणे आंदोलन – जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी जोरदार आवाज!**

नाशिक प्रतिनिधी
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आदेशान्वये आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटना यांच्यावतीने आज 6 मार्च 2025 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जुनी पेन्शन योजना,वाढीवटप्पा अनुदान, सेवानिवृत्तीचे वय 60 करणे, कंत्राटी धोरण रद्द करणे आधी सह इतर विविध मागण्यासाठी दुपारी दोन ते चार या वेळात धरणे धरून नाशिक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सन्माननीय राजेंद्र वाघ साहेब यांना सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विविध संघटनेचे पदाधिकारी त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सन्माननीय देशमानकर साहेब, अहिरे साहेब, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे, टीडीएफचे मोहन चकोर, रवींद्र मोरे, चंद्रकांत कुशारे, रोहित गांगुर्डे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *