अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याद्वारे पीडित, शोषित, दुर्लक्षितांना आवाज बुलंद करण्याची प्रेरणा दिली ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना डॉ अण्णाभाऊ साठे विशेष गौरव पुरस्कार प्रदान
1 min read

अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याद्वारे पीडित, शोषित, दुर्लक्षितांना आवाज बुलंद करण्याची प्रेरणा दिली ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना डॉ अण्णाभाऊ साठे विशेष गौरव पुरस्कार प्रदान

Loading

अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याद्वारे पीडित, शोषित, दुर्लक्षितांना आवाज बुलंद करण्याची प्रेरणा दिली
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना डॉ अण्णाभाऊ साठे विशेष गौरव पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन(अलंकार हॉल): महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ,प्रवचनकार व विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने सेवाव्रती कार्य करणारे येथील डॉ रवींद्र भोळे यांना नुकताच अण्णाभाऊ साठे विशेष गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र , शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. रवींद्र भोळे हे समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक असून त्यांनी नैसर्गिक आपत्ती मराठवाडा ,भूकंप, पुरंदर पूर्व भागात दुष्काळग्रस्त भागात वैद्यकीय सेवा, कोरोना पेंडेमिक मध्ये समर्पित भावनेने कार्य, राष्ट्रीय सेवा योजना मार्गदर्शन ,वृक्षारोपण ,मूकबधिर मतिमंद सेवा कार्य, तसेच सामाजिक, धार्मिक ,वैद्यकीय अध्यात्मिक, इत्यादी क्षेत्रांमध्ये विशेष योगदान दिलेले आहे. गेली 35 वर्षे पासून ते राज्यभर समर्पित भावनेने विविध निष्काम कर्मयोगी कार्य करीत आहेत. तसेच कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत. तसेच प्रायमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन च्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम, आरोग्य मोहीम, कुष्ठरोगदरीकरण मोहीम, स्वाइन फ्लू जनजागृती मोहीम, बालकुपोषण मोहीम ,इत्यादी मोहीम त्यांनी अविरतपणे गेली अनेक वर्ष पासून राबविलेल्या आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे अल्प दरात परिणामी धर्मदाय सेवा देत आहेत. त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्यहि केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉअण्णा भाऊ साठे विशेष गौरव पुरस्कार डॉ. रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. येथे सचिन भाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. रवींद्र भोळे, डॉ.अशोक घोणे ,दिलीपराव मस्के माजी उपसरपंच डाळिंब, सुहास नाईक, शिवव्याख्याते संजय भालेराव ,दिगंबर जोगदंड ,मच्छिंद्र खवळे, बाबुराव साळवे ,शाहीर सोनटक्के ,सारिका लोणारी इत्यादींना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिन भाऊ साठे यांचा व त्यांची कन्या राजनंदिनी हिचा वाढदिवस असल्याने संघटनेच्या वतीने शाल,पुष्पहार आणि केक कापून वाढदिवसाच्या केला.सौ दिशा ताई साठे या सचिन भाऊ साठे यांच्या अर्धांगिनी नुकत्याच कायद्याची पदवी प्राप्त झाल्यामुळे त्यांचाही संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी आपले मत व्यक्त करताना मनोगतात सांगितले की अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या ,दहा पोवाडे ,दहा लोकनाट्य 24 लघुकथा व अनेक पोवाडे व अनेक लावण्या त्याचप्रमाणे प्रवास वर्णन लिहून समाज प्रबोधन, समाज उन्नयन, व समाज पुनरुवस्थापनाचे कार्य केले. अण्णाभाऊ हे मार्क्सवादी व आंबेडकरवादी चळवळीचे प्रणेते होते, अण्णाभाऊंनी दलित शोषित ,श्रमिकाला , श्रमिका चा आवाज बुलंद करण्यासाठी प्रेरणा दिली..अण्णाभाऊ साठे महान समाज सुधारक ,लेखक व कवी होते. याप्रसंगी एबीएस क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर ,कोर कमिटीअध्यक्ष टीएन कांबळे, लाल सेना अध्यक्ष अशोक उपाडे महाराष्ट्र पश्चिम राजाभाऊ आढागळे ,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अविनाश कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष उषाताई खिलारे पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष आशाताई डांबरे ,प्रदेश सोशल मीडिया आकाश घोलप, व्हिडिओ उपाध्यक्ष योगेश पाटोळे आकाश वाडेकर पत्रकार अमोल भोसले,पत्रकार सुनील तुपे, उरुळी कांचन,इत्यादी मान्यवरउपस्थित होते. कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील सर्व एबीएस क्रांती फोर्स चे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पुणे जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *