खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत  तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन
1 min read

खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन

Loading

खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत

तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन

 

तांदळी (ता.अमळनेर)- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट समिती तांदळी येथे वॉटरशेड (पाणलोट) यात्रेचे दि. 1 मार्च रोजी तांदळी येथे आगमन झाले होते. यानिमित्ताने तांदळी येथे आलेल्या जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ सत्कार व स्वागत तांदळीच्या सरपंच सौ. रत्नाबाई सुनिल परदेशी व तांदळी गावच्या महिला भगिनी यांनी केले. यावेळी तांदळी येथे संपन्न झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांनी पाझर तलाव, बंधारे, शेततळी, मृद व जलसंधारणाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले व शेतीला आधुनिक स्वरुप कसे देता येईल याविषयी मार्गदर्शन केले. बचत गटाचे स्टॉलला भेट देऊन मान्यवरांनी कौतुक केले. अमळनेर तालुक्यातून कळमसरे व तांदळीची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे तांदळी जि.प. शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेली स्वागतगिते, नृत्य सर्वांनाच भावले. त्यासाठी परिश्रम घेणारे शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा मृदु जलसंधारण अधिकारी बाळकृष्ण ढंगारे, उपविभागीय कृषी अधिकारी साठे, तालुका कृषि अधिकारी ठाकरे साहेब, जिल्हा प्रकल्प समनव्यक पुरुषोत्तम पाटील, शहापुर निम येथील ग्राम महसुल अधिकारी, तांदळी ग्रामपंचायत अधिकारी समाधान निकम, जितेंद्र जोगी, विक्रम कदम आदींसह तांदळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुनियोजनाबद्दल मान्यवरांनी सरपंच रत्नाबाई सुनिल परदेशी व तांदळी ग्रामपंचायत तांदळी ग्रामस्थांचे कौतुक केले. शेवटी मृद व जलसंवर्धनाची सामुदायिक शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *