ज्ञानसाधनेसाठी शिवालये मंदिरे महत्त्वाची… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
1 min read

ज्ञानसाधनेसाठी शिवालये मंदिरे महत्त्वाची… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

Loading

ज्ञानसाधनेसाठी शिवालये मंदिरे महत्त्वाची… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

 

वाघापूर (माणकेश्वर) आपले शरीर नश्वर आहे.मनुष्याचे अस्तित्व पृथ्वीतलावर किती दिवस असते, तसेच कोणीही पृथ्वीतलावर अमर नाही याचे ज्ञान अध्यात्माद्वारे होते.गीतेमध्ये धर्माने वागून मोक्षप्राप्तीचा संदेश देण्यात आलेला आहे . तसेच जीवनामध्ये यज्ञ ,दान, तप, आणि कर्म करणे गरजेचे असल्याचेही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.माझा धर्म काय आहे आणि माझे कर्मकर्तव्य काय आहे यातच गीतेचा सर्व सारांश सामावलेला आहे .धर्माचरण करणाऱ्यांना महाशिवरात्रीचे पर्व शिवतत्व कळते. शिव तत्व हे संहारक आणि रक्षक करणारे सुद्धा आहे. पृथ्वीचे व सर्व प्राणीमात्रांचे जीवन वाचवण्यासाठी भगवान शंकराने समुद्रमंथनातून निर्माण झालेले हलाहल विष प्राशन करून जगाचे कल्याण केले. शक्यतो भगवान शंकराचे मंदिरे हे निर्मनुष्य ठिकाणी व नैसर्गिक सौंदर्य नटलेल्या वृक्षवल्लीच्या ठाई आहेत . वृक्ष झाडे हे आपणाला ऑक्सिजन देऊन पर्यावरणाचा समतोल राखतात.यातून बोध घ्यावा की पंचमहाभूते तत्त्वांचा ऱ्हास होऊ नये म्हणून वृक्षवल्ली वृक्षारोपण महत्त्वाचे आहे. कलियुगात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जगाचे कल्याण करण्याची भावना असणारी शिवतत्त्वाची जपणूक करणे महत्त्वाचे आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री माणकेश्वर महाशिवरात्र व अखंड हरिनाम सप्ताह , शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रवचनाचे पुष्प गुंफतांना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की या पवित्र ठिकाणी पाचशे वर्षांपूर्वी उत्तर व पश्चिमेकडे असलेल्या टेकडीवर भगवान शंकराची पिंड होती. माणिक नावाचा आपला भक्त हा जन्मभर त्या पिंडीची भगवान शंकराची सेवा करीत होता. परंतु वार्धक्य असल्यामुळे माणिक टेकडीवर चढू शकला नाही. अशावेळी त्याने परमेश्वराला विनंती केली की देवा मी आता आपले दर्शन घेऊ शकत. यावेळी परमेश्वराने त्यांना ज्या ठिकाणी दर्शन दिले व ज्या ठिकाणी परमेश्वर अंतर्ज्ञान पावले ती जागा म्हणजे श्री माणकेश्वर मंदिर होय. माणिक नावाच्या भक्तामुळे या क्षेत्राला श्री माणकेश्वर असे नाव पडले. या ठिकाणी अनेक योगी येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे नवनाथातील चौरंगीनाथ विभूती येथे वास्तव्य होती ,असे सांगितले जाते. असे पवित्र ठिकाण ज्ञान साधनेसाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी ह भ प महादेव महाराज खराडे (गुरुळी) ह भ प दशरथ महाराज कादबाणे( खळद), ह भ प दिव्यानंद गिरी महाराज माणकेश्वर मंदिर (वाघापूर, )ह भ प दशरथ महाराज इंदलकर राष्ट्रीय संयोजक अखिल भारतीय नर्मदा सेवा संघ (वाघापूर,) ह भ प डॉ.रवींद्र भोळे हिंदू रत्न पुरस्कार विजेते समाजसेवक प्रवचनकार (उरुळी कांचन) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ह भ प गणेश महाराज फरताळे (वढू बुद्रुक तालुका हवेली,) ह भ प प्रवीण महाराज लोळे (पानवडी पुरंदर,) ह भ प शिवाजी महाराज भोसले माहूर (पुरंदर, )ह भ प श्री गुरु मूर्ती चैतन्य महाराज शिंदे (लोणी काळभोर हवेली), ह भ प रामदास महाराज चांदगुडे (केशवनगर मुंढवा पुणे,) त्याचप्रमाणे ह भ प ऋषिकेश महाराज नवले (राहू दौंड पुणे)यांची कीर्तने झाली. याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवरां समवेत अर्जुन भाऊ कुंजीर (फौजी) ह भ प राजाराम तात्या कुंजीर, ह भ प हनु दादा कुंजीर, ह भ प बबन भाऊ इंदलकर, ह भ प दशरथ महाराज इंदलकर, ह भ प बापूसो महाराज गायकवाड, ह भ प गोरख दादा कुंजीर, आदरणीय वसंत कुंजीर, माऊली नाना इंदलकर,बाजीरावशेठ कुंजीर माजी सरपंच, ऍड नितीन कुंजीर, बाजीराव गणपत कुंजीर माजी सरपंच, पो.पा विजय कुंजीर,श्री माऊली इंदलकर, अशोक बापू कुंजीर( इतिहास संशोधक,) नामदेव बापू कुंजीर, अशोक आप्पा कुंजीर, रोहिदास कुंजीर, लाडू अण्णा इंदलकर, प्रशांत कुंजीर, नितीन चांगदेव कुंजीर, रवा नाना कुंजीर, अरुण तात्या कुंजीर, विकास इंदलकर, काशिनाथ नाना, भाऊसाहेब कुंजीर, मच्छिंद्र कुंजीर, संतोष कुंजीर, दत्तात्रय कुंजीर , डिके कुंजीर, योगेश भाऊ कड, रोहिदास कुंजीर, पोपट गुरुजी, विठ्ठलदादा, बापू पाणीवाले,रामदास आप्पा, विपुल कुंजीर, विकास इंदलकर, सौ संगीताताई कुंजीर, सौ विजयाताई कुंजीर, सौ उषा कुंजीर, सौ कमल सोनवणे बापू पाणलोट, , श्री अंतुले कुंजीर, पंचक्रोशीतील भाविक भक्त, शिवभक्त, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आलेल्या सर्व भक्त मंडळींना समस्त ग्रामस्थ वाघापूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.श्री माणकेश्वर महाशिवरात्र अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे सोळावे वर्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *