२७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण
![]()
मराठी राजभाषा दिन
२७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन
स्वागताला आज आलं उधाण
आता बोलू या मराठीतून
तिचा गोडवा घेऊ जाणून
अनेक संत, हुतात्मे, देशभक्त जन
सर्वांनी घेतलं मराठीचं ज्ञान
दु:खी मना मराठी देई आनंद
जिवा लागे साहित्य लेखनाचा छंद
तिजमुळे झाले धुंद
दुष्काळात मिळे जसे भुकेल्यास अन्न
मराठी असे ऐकायास गोड
गुण वर्णाया शब्द पडतील थोडं
मराठी असे सुलभ
घेता ज्ञान होई भलं
मराठी भाषा जणू दुधावरची साय
भाषा अनेक जरी , मराठी असे माय


मराठी भाषा जसा खरा मोती
भाषा शिकता घडे संस्काराची नाती
मराठी भाषा जणू ,सद् गुणांची खाण
तिचा वाटू द्या अभिमान
मराठी भाषा आहे गोजिरवाणी
तिचं साहित्य वाचता नयना आलं पाणी
अनुपमा जाधव


