हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत…  कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .
1 min read

हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .

Loading

हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत…

कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ): प्रवास करताना आपली बॅग किंवा इतर वस्तू रिक्षा किंवा टॅक्सी यामध्ये आपण विसरतो.अश्यावेळी आपली वस्तू शोधण्यासाठी खूप काही कसरत करावी लागते
असाच एक प्रकार कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दीत दि २५/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वाजेच्या दरम्यान श्रीमती चैत्राली लागू राहणार पुणे ह्या रीजन्सी अनंतम येथे लग्नाच्या कार्यक्रमाकरिता आल्या असताना त्यांच्याकडे असलेल्या लॅपटॉपची बॅग रिक्षामध्ये विसरून गेल्या.

याबाबत रिजन्सी अनंतम कल्याण शीळ रोड कोळसेवाडी वाहतूक शाखेचे चौकी मध्ये मपोहवा/ शिंदे व पोहवा सोनवणे यांना सांगितल्यानंतर तात्काळ रिजन्सी अनंतम येथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज त्या हरवलेल्या मालकाला दाखवून त्यांनी रिक्षाची खात्री केली.त्यानंतर वाहतूक अंमलदारांनी सदर रिक्षाचा क्रमांक व सविस्तर माहिती मिळविली.

सदरची रिक्षा दूरध्वनी क्रमांक काढून त्या क्रमांक वर रिक्षा चालक राजपूत यांना संपर्क केला असता त्याने त्याचे रिक्षामध्ये बॅग आहे असे सांगितले.तेव्हा रिक्षाचालक राजपूती यांना त्याचे रिक्षेमध्ये राहिलेली लॅपटॉप बॅग आणून देण्याकरिता त्या पोलीस अंमलदारांनी विनंती केली.

सदरचा लॅपटॉप असलेली बॅग लॅपटॉप मालक श्रीमती चैत्राली लागू यांना परत दिल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *