साई इंग्लिश अकॅडमीत ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा: यशस्वी विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार!
![]()
साई इंग्लिश अकॅडमीत ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा: यशस्वी विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साई इंग्लिश अकॅडमीतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार सत्कार आणि प्रतिष्ठेचा ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. इंदिरा भवन येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरदार यशपाल पवार (वर्ग 1 राजपत्रित अधिकारी, असिस्टंट कमांडंट) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे भाषण दिले.
डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाड्:मय मंडळ अमळनेर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून श्यामकांत भदाणे (उपाध्यक्ष, म. वा. मंडळ, अमळनेर), अतुल कोतकर (म्युच्युअल फंड सल्लागार, संगमनेर), आणि सौ. प्रतिभा मगर (सरकारी वकील, पारोळा) उपस्थित होते.
सोहळ्याला सरस्वती पूजनाने सुरुवात झाली, तर मृणाल पाटीलने सादर केलेले स्वागत गीत उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे होते. यावेळी नेहा पाटील, रिचल पाटील, हिमानी पाटील, आणि कल्याणी पाटील यांनी आपल्या मनोगतातून यशाच्या महत्त्वाचे विचार व्यक्त केले.

या सोहळ्यात 125 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘साई रत्न’ पुरस्कार यशोदीप दीपक पवार, पूनम शितल भारोटे, सनय मिलिंद पाटील, आणि सुमित भरत पाटील यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब मगर (संचालक, साई इंग्लिश अकॅडमी) यांनी केले तर प्रियंका बारीने सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्याच्या यशात महत्त्वाची ठरली. साई इंग्लिश अकॅडमिच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल!

