अमळनेरमध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘Home Based Program’ अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वी
1 min read

अमळनेरमध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘Home Based Program’ अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वी

Loading

अमळनेरमध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘Home Based Program’ अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण यशस्वी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी, रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी ‘Home Based Program For Children With Disabilities’ विषयावर तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप 23 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला, त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नानासाहेब रतिलाल गिरधर चव्हाण, से. नि. नायब तहसीलदार होते.

 

 

 

कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत श्री रवींद्र गंगाराम माळी (प्रा. फार्मसी कॉलेज, अंमळनेर), श्री किरण भिला माळी व सौं प्रतिभा किरण माळी (संचालक IKD क्लासेस, अंमळनेर), डॉ पंकज महाजन (M.D Medicean, गणपती हॉस्पिटल, अंमळनेर), डॉ मयूर महाजन (भूलतज्ञ, गणपती हॉस्पिटल, अंमळनेर), डॉ चंद्रकांत महाजन (डायट्स अँड योगा क्लिनिक), डॉ. चारुशीला महाजन (अमळनेर), संजीवनी घोगडे, सौं शीतल सोमेश्वर महाजन, सौं वंदना रवींद्र माळी (समाज सेविका), तसेच अण्णासो डॉ योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष, परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा) उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार डॉ योगेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी मतिमंद मुला-मुलींसाठी निःस्वार्थ सेवेसाठी मान्यवरांचा सामूहिक सत्कार करीत त्यांचे कौतुक केले.

 

 

 

यावेळी श्री किरण भिला माळी यांनी दिव्यांग मुलांसाठी अन्नधान्य आणि किराणा यासाठी 11,000/- रुपयांची मदत दिली. समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले, ज्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित झाले.
या विशेष उपक्रमामुळे स्थानिक समाजात दिव्यांग मुलांसाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *