छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन न नाचता, त्यांचे विचार डोक्यात रुजवा -अजय भामरे
1 min read

छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन न नाचता, त्यांचे विचार डोक्यात रुजवा -अजय भामरे

Loading

छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन न नाचता, त्यांचे विचार डोक्यात रुजवा -अजय भामरे

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी. एन. पाटील पर्यवेक्षक श्री एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालय व प्रमुख व्याख्याते अजय भामरे सर तसेच प्रमुख अतिथी मुख्याध्यापक संदीप पवार सर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंचच्या सचिव सौ. भारती चव्हाण मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षिका वंदना जाधव मॅडम यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर प्रमुख व्याख्याते श्री अजय भामरे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अजय भामरे सर यांनी आपल्या मनोवेधक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार- आचार आणि संस्कृती हे गीत गायनाच्या माध्यमातून तसेच गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांसमोर कथित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले त्यांची रचना, उभारणी तसेच समाज व्यवस्था, समाजातील गोरगरिबांची अवस्था आणि त्यातील सुधारणा आणि राजकीय कायदे याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशासन कशाप्रकारे जनतेच्या भल्यासाठी उपयोगी राहिले हे सोदाहरण स्पष्ट करून दिले.

 

 

 

 

 

 

 

ते पुढे म्हणाले की , ‘ छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते डोक्यावर घेऊन न नाचता , त्यांचे विचार आपल्या डोक्यात रुजवले पाहिजे ‘ हीच त्यांची खरी मानाची जयंती ठरेल. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती आणि राज्यगीत ‘ जय जय महाराष्ट्र माझा ‘ या गौरवगीताने करण्यात आली. सदरप्रसंगी व्ही.डी. पाटील , ए.पी. जाधव, पी.एम. ठाकरे, तसेच एस. एस. तेले, सी.डी. निकम ,ए. यु. महाजन आणि माध्यमिक विभागातील दीपक पाटील, अनिल माळी, रूपाली भामरे, स्वाती बोरसे, संगीता बाविस्कर, हर्षल पाटील, हेमंत साळुंखे, सी.एस. पवार, व्ही. एन. पाटील ,तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी जगदीश पाटील, शिवाजी पाटील, प्रमोद महाजन आणि अशोक सैंदाणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री डी. ए. सोनवणे यांनी केले . उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे सर यांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा प्रत्येकी दहा – दहा प्रश्न उत्तरासहित वृत्त पत्रातील कात्रण अल्बम संग्रहित करून ३०० प्रश्नांची उत्तर त्यात समाविष्ट आहेत. या कार्यक्रमात सदरहू अल्बमचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘ सदर अल्बमचा शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण उपयोग होणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपणासही लाभणार आहे ‘ असे प्रतिपादनही प्रमुख व्याख्याते अजय भामरे यांनी डी.ए. सोनवणे यांचे अभिनंदनाचा वर्षाव करीत जाहिर कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *