ब्राम्हणवेल गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
1 min read

ब्राम्हणवेल गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Loading

ब्राम्हणवेल गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

 

धुळे प्रतिनिधी

. . . . साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
गावातून प्रभातफेरी . . कै बळीरामदादा माध्य विद्यालाय व जि.प.शाळा यातील विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली . या रॅलीत जय भवानी – जय शिवाजी ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ हर हर महादेव अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून व बॅडपथक ढोल तासे मिरवणूकीने संपूर्ण गावातून प्रभातकेरी काढण्यात आली . यावेळ ग्रामस्थ व विविध संस्थाचे पदाधिकारी सहभागी होते.
ग्रामपंचायत येथे प्रतिमापूजन …
ग्रामपंचायत ब्राह्मणवेल येथील प्रवेशद्वार वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुलहार अर्पण करण्यात आला .नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन ब्राम्हणवेलचे माजी सरपंच व संख्याध्यक्ष श्री तुकाराम महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी ग्रा. प . उपसरपंच श्री . कैलास महाजन ‘ ग्रा. प . सदस्य श्री सुरेश देसाई ‘ गजूभाऊ पवार व गावाचे पोलीस पाटील श्री . शामकांत नांद्रे यांसह सर्व पदाधिकारी गावातील सर्व शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका ‘ आरोग्य परिचारीका आणि सर्व माध्य शिक्षक व जि प शाळांचे शिक्षक वृंद आणि ग्रा पं कर्मचारी श्री मधुकर देवरे सह मान्यवर उपस्थित होते .
माध्य शाळेत प्रतिमा पूजन …
कै . बळीरामदादा माध्य विद्यालयात सर्व रॅली विद्यालयाचा प्रांगणात आली .या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेशभाऊ देसाई , प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा पं सदस्य श्री गजुभाऊ पवार,,पोलीस पाटील श्री श्याम भाऊ नांद्रे संस्थेचे सचिव एकनाथजी महाजन शाळेचे मुख्याध्यापक श्री . गणेश माळी सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ‘ जिल्हा परिषद मुख्याध्यापक ‘शिक्षक ‘उपस्थित होते .यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश झोत श्री गणेश माळी श्री लक्ष्मण बागुल व श्री एकनाथ महाजन यांची भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावात श्री काशिनाथ माक यांनी शाळेत श्री हिरामण सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन श्री काशिनाथ माळी यांनी केले .🌹🙏🏾🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *