कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
![]()
*कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग व प्रशासन यांच्यातर्फे आज दिनांक 19/2/25 रोजी सकाळी 7.30वाजता पदयात्रा मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत नागरिक, शालेय विद्यार्थी व शिक्षक, पालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कल्याण येथील नॅशनल उर्दू स्कूल शाळेच्या प्रांगणातून दुर्गाडी किल्ल्या वरून ही पदयात्रा मोठ्या उत्साहात आनंदातसुरू झाली या मिरवणुकीत
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्मा.आयुक्त डॉ इंदूराणी जाखड मॅडम,
अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड साहेब, उपायुक्त संजय जाधव साहेब, उपायुक्त रूपाली परदेशी मॅडम, बिर्ला कॉलेजचे डायरेक्टर नरेश चंद्र सर, डॉ. असोसिएशनचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, उपप्राचार्य श्री दुबे सर,बिर्ला कॉलेजचे एनएसएस युनिटचे प्रोग्राम ऑफिसर डॉ. प्रा.जायफळे सर कल्याण डोंबिवली शिक्षण अधिकारी विजय सरकटे साहेब,
डीपी ग्रुपचे मच्छिंद्र जाधव, जवाहर बाल भवन महाराष्ट्र शासन चे उपाध्यक्ष प्रशांत भामरे, अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटन चे विलास जाधव,
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल नागपूर.
विभाग कल्याण चे आर एस पी अधिकारी श्री मनीलाल शिंपी, अनंत किनगे, विनोद शेलकर, दिगंबर जोगमार्गे, योगेश अहिरे,संतोष औटी, दत्तात्रय पटवर्धन, बापू शिंपी, दिलीप पावरा यांनी विशेष सहकार्य केले.आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतुकास्पद आहे अशा शब्दात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी अभिनंदन केले.यावेळी महापालिका अधिकारी, शाळांचे विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सांगता आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे करण्यात आली. यावेळी महापालिका शाळेतील मुलांनी शिवाजी महाराजांवर विविध कार्यक्रम सादर केले.
या समारोप प्रसंगी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड मॅडम, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण अत्रे रंगमंदिर दुमदुमून गेले
शिक्षणाधिकारी
विजय सरकटे साहेब
यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पदयात्रा व समारोप कार्यक्रम
उत्साहात आणि अतिशय आनंदात संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे,विविध वेशभूषा करून छत्रपती शिवरायांच्या जयंतीची शोभा वाढवणारे बालकलाकार तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षणाधिकारी विजयजी सरकटे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

