JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला
1 min read

JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला

Loading

JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
JEE मुख्य परीक्षा 2025 (JEE Mains) च्या पहिल्या सत्राचा निकाल 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरातील आय.आय.टी. प्रवेशाच्या JEE Advance परीक्षेची पात्रता व देशातील एन.आय.टी. व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
धुळ्याच्या आदित्य पाटीलने या परीक्षेत 300 पैकी 290 गुण (NTA Score 99.9936728) मिळवून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे.
आदित्य पाटीलचे प्राथमिक शिक्षण धुळे येथील चावरा स्कूलमधून झाले असून माध्यमिक शिक्षण त्याने सिम्बॉसिस स्कूल, नाशिक येथे पूर्ण केले. सध्या तो JEE Advance 2025 परीक्षेची तयारी Narayana IIT JEE Academy, अंधेरी, मुंबई येथे करत आहे.
तो साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे जेष्ठ संचालक, सेवानिवृत्त शिक्षक भीमराव जाधव व सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापिका वृशाली भिमराव जाधव यांचा नातू आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचा माहोल आहे, आणि अनेकांना प्रेरणा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *