दहीवद येथे माध्यमिक शाळेत तब्बल ४३ वर्षानी दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
![]()
दहीवद येथे माध्यमिक शाळेत तब्बल ४३ वर्षानी दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शालेचे माजी विद्यार्थी नासिक ग्रामीण येथिल पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांचे संकल्पनेतुन रविंद्र मोरे , कैलास महाराज , विजय वाणी यांचे प्रयत्नातुन संपन्न झाला.स्नेह मेलावा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक श्री यू ओ चौधरी सर होते तर प्रमुख अतिथी सौ सुषमाताई वासुदेव पाटिल संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति अमलनेर, संस्थेचे चेअरमन श्री जयवंत पाटिल व् संस्थेचे सचिव श्री सुभाष पाटील होते, मुख्याध्यापक श्री आसाराम सैदाने सर तत्सम कालावधितील सर्व सेवानिवृत्त गुरुवर्य श्री यू ओ चौधरी सर , श्री जे बी शेलकर सर,श्री बी एन लोहार सर ,श्री बी ए लंबोले सर, श्री ए बी पाटिल सर,श्री गुलाबराव बोरसे सर तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री रामकृष्ण सुतार श्री आनंदा बापू पाटिल यांचा पुष्पहार शाल ,श्रीफल ,स्मृतिचिह्न, ताम्र दीप व ड्रेस-साड़ी कपड़े देवून यथोचित सत्कार वासुदेव देसले यानी केला ,
तसेच माजी विद्यार्थीनी सौ सुरेखा पाटिल बड़ौदा, सौ रत्न प्रभा सोनार कल्याण ,सौ प्रतिभा देशमुख ठाणे , सौ अनुपमा कांकरिया धुले, सौ राजश्री अढ़ाले जलगांव यांचाही “माहेर ची साड़ी “शाल श्रीफल पुष्पहार ताम्र दीप , व स्मृति चिन्ह भेट देवून सौ सुषमाताई वासुदेव पाटील यानी सत्कार केला ,४३ वर्षानी पुनः एकत्र विद्यार्थी व शिक्षक आले याचा मनस्वी आनंद तर होताच परंतु काही गुरुवर्य विद्यार्थ्याना सोडून गेले म्हणून कार्यक्रमच्या सुरवातीस कै श्री कोल्हे सर ,कै श्री एस डी पाटील सर , कै श्री प्रभाकर पाटील सर , कै श्री सोनवने सर , कै श्री मधुकर रडे सर, कै श्री मधुकर सोनार सर , कै श्री शिम्पी सर व वर्ग बंधु कै प्रभाकर महाले याना भावपूर्ण आदरांजलि अर्पण करण्यात आली व कार्यक्रमस सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले,मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर विद्यालयाचे सचिव श्री सुभाषराव हिम्मतराव पाटील यानी संस्थेच्या वतीने शालेचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नति झालेने त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफल देवूंन सत्कार केला व सर्व माजी विद्यार्थी ४३ वर्षानी आमच्या शालेत पुनः आले म्हणून सर्वचे कौतुक व आभार मानले ,सर्व शिक्षक विद्यार्थी यानी ४८ वर्षपूर्वीचे आठवनीना उजाला दिला, चौधरी सर व लाबोळे सर यानी पुनः वर्गात जावुन माजी विद्यार्थी यांना शिकविले ,विद्यार्थी जे सेवानिवृत झाले तेही वर्गात बसुन चौधरी सर यानी ४३ वर्षपूर्वी शिक़वलेले गणित आठवणीत आणले,नमूद वर्गात माजी विद्यार्थी म्हणून- पोलिस उप अधिक्षक वासुदेव देसले , ह भ प कैलास पाटील,प्रा.रवींद्र मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेन्द्र पाटील ,संजीव प्रतापराव सोनवने,मुख्याध्यापक धनंजय खंडेराव सूर्यवंशी, विजय भाऊराव पवार,रवींद्र विश्वनाथ महाजन,सेवानिवृत जवान कैलास दगड़ू माळी, सेवानिवृत्त पोलिस हवालदार रोहिदास सोनावने,सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय वाणी,सेवानिवृत सचिव रमेश पोपट अहिरे तसेच आदर्श शेतकरी नागरिक राजेंद्र राजधर पाटिल, राजेंद्र धोंडू पाटील ,राजेंद्र डोंगर पाटील , कैलास बोरसे , शांताराम सुकलाल माळी, गोकुल काशीनाथ पाटील,शिवाजी विश्राम पाटील ,पंडित राजेन्द्र पद्माकर मांडे , विश्वासराव पाटिल, अकबर चांद खाटिक,हे हजर होते.नमूद स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी वासुदेव देसले रविंद्र मोरे , कैलास पाटील , विजय वाणी , राजेन्द्र पाटील यानी विशेष प्रयत्न केले व् संस्थेचे चेअरमन यानी सहकार्य केले..


