पाडळसरे धरणाच्या निधीसाठी जन आंदोलनाची तयारी: खेडी भोकरी पुलावरून संघर्षाचा इशारा” **जलसंपदा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना कठोर संदेश** – **२५ वर्षांच्या विलंबानंतर, निधीची मागणी करणारं आंदोलन** – **खेडी भोकरी पुलाच्या निधींचा पुनर्वाटप: धरणाच्या विकासासाठी धोका** – **अमळनेर जनतेची एकजुटीची गूंज: आंदोलकांची ग्वाही** – **राज्यसरकारसमोर विशिष्ट निधीची आवश्यकता आणि जन अपेक्षा** – **सामाजिक संघटनांचा आवाज: निधीवाटपात चांगलासा विचार आवश्यक**
![]()
“पाडळसरे धरणाच्या निधीसाठी जन आंदोलनाची तयारी: खेडी भोकरी पुलावरून संघर्षाचा इशारा”
**जलसंपदा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना कठोर संदेश**
– **२५ वर्षांच्या विलंबानंतर, निधीची मागणी करणारं आंदोलन**
– **खेडी भोकरी पुलाच्या निधींचा पुनर्वाटप: धरणाच्या विकासासाठी धोका**
– **अमळनेर जनतेची एकजुटीची गूंज: आंदोलकांची ग्वाही**
– **राज्यसरकारसमोर विशिष्ट निधीची आवश्यकता आणि जन अपेक्षा**
– **सामाजिक संघटनांचा आवाज: निधीवाटपात चांगलासा विचार आवश्यक**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा कोट्यवधींचा निधी खेडी भोकरी पुलाला दिल्यास पाडळसरे धरण जन आंदोलन समिती तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,कार्यकारी अभियंता
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे यांचेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या धरणाचे काम निधीअभावी गेल्या २५ वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे १०० कोटी रु मिळतात. त्यामुळे काम अपूर्ण राहून प्रकल्पाची किंमत वाढत जाते. चोपडा व जळगाव च्या हद्दीवर असलेल्या खेडी भोकरी पुलाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ७५ कोटी आणि निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचे ७५ कोटी असे एकूण १५० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. आधीच निम्न तापी प्रकल्पातून १५ कोटी देण्यात आले आहेत. यातील अजून उर्वरित रक्कम दिल्यास निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी निधी शिल्लक राहणार नाही ज्यामुळे धरणाच्या कामावर विपरीत परिणाम होतो आणि ७५ कोटींचा निधी पुन्हा खेडी भोकरी पुलाला खर्च झाल्यास धरणाचे लाभ व्येय गुणोत्तर कमी होईल. सदर प्रकल्प आणखी रखडेल. त्यामुळे शासनाने खेडी भोकरी पुल आवश्यकच असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्वतंत्र निधी देण्यात यावा असेही जलसंपदा विभागाला समितीतर्फे सुचविण्यात आले आहे.
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या निधीतील कोट्यवधींचा निधी पुन्हा खेडी भोकरी पुलाला दिल्यास पाडळसरे धरण जन आंदोलन समिती तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा जनआंदोल समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, महेश पाटील, हेमंत भांडारकर, सुनिल पाटील,रामराव पवार, सुशिल भोईटे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प पाडळसरे यांचेसह मुख्य अभियंता,तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, कार्यकारी संचालक,तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांना इमेल द्वारे दिलेल्या निवेदनात दिला आहे.

