महात्मा फुले हायस्कूल मध्ये निरोप समारंभ व परीक्षा पे चर्चा !…
1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये निरोप समारंभ व परीक्षा पे चर्चा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये निरोप समारंभ व परीक्षा पे चर्चा !…

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावीचे वर्ग शिक्षक एस व्ही आढावे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी पंचायत समितीचे डॉ.जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहावीचे वर्ग शिक्षक पी डी पाटील यांना मुलांना एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेविषयी विस्तृत अशी माहिती सांगून मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी दहावीचे विद्यार्थी नंदिनी भोई, तेजस्विनी माळी, कोमल भोई, चेतना जावरे, सोनू कुंभार, हर्षल भोई, वादीश शिरसाठ, सपना मराठे, ललीता झेंडे, जयपाल राजपुत यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार सर यांनी मुलांना बोर्डाच्या परीक्षा विषयी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे ” परीक्षा पे चर्चा ” यासंदर्भात लाईव्ह संगणकावर विद्यार्थ्यांना कार्यक्रम दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या सर्व प्रश्नांचे व शंकाचे शिक्षकांनी निरसन केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी केले तर कार्यक्रमाला शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *