अमळनेरच्या सानेगुरुजी शाळांमध्ये पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वर्तनाची चिंता, सुधारणा करण्याचे आवाहन  विद्यार्थ्यांमधील हिंसकता कमी करण्यासाठी संगीत शिक्षकाची नेमणूक करा -संदीप घोरपडे यांचा प्रस्ताव
1 min read

अमळनेरच्या सानेगुरुजी शाळांमध्ये पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वर्तनाची चिंता, सुधारणा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांमधील हिंसकता कमी करण्यासाठी संगीत शिक्षकाची नेमणूक करा -संदीप घोरपडे यांचा प्रस्ताव

Loading

अमळनेरच्या सानेगुरुजी शाळांमध्ये पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वर्तनाची चिंता, सुधारणा करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांमधील हिंसकता कमी करण्यासाठी संगीत शिक्षकाची नेमणूक करा -संदीप घोरपडे यांचा प्रस्ताव

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – आज सानेगुरुजी विद्यामंदिर, नुतन माध्यमिक विद्यालय आणि कन्या हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत गंभीर चिंतेचा विषय उपस्थित केला. या मेळाव्यात प्रारंभात सानेगुरुजी यांची “खरा तो एकची धर्म” प्रार्थना म्हटली ..

विचारपिठावर हेंमकांत पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष गुणवंत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सहसचिव एडवोकेट अशोक बाविस्कर , सदस्य अमृत पाटील, मगन पाटील, डॉ शेख शकील जलोद्दीन, भास्कर बोरसे, युवराज सोनवणे ,किरण पाटील,मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील,
श्रीमती अनिता बोरसे,संजीव पाटील,
शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते

 

 

 

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. संदीप घोरपडे यांनी पालकांना संबोधित करताना पालकांचे आभार मानले आणि म्हटले की, “या मेळाव्यातील उद्दिष्ट म्हणजे पालकांच्या मनातील प्रश्नांचे समाधान करणे.” त्यांनी विद्यार्थ्यांमधील खोडचळपणा आणि हिंसक वागणूक याबाबत चिंता व्यक्त केली. “मोबाईलच्या वाईट परिणामांमुळे विद्यार्थ्यांचा चांगला विकास अडचणीत येत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
संदीप घोरपडे यांनी पालकांना सांगितले की, “आताच्या मुलांची वागणूक चिंताजनक आहे, शाळेत चोरी आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे हे सध्या सामान्य झाले आहे.” शाळेत लागू करण्यात आलेल्या काँपी मुक्त अभियानावर त्यांनी प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.
एक पालकाने मेळाव्यात शपथ घेतली की, “मी आजपासून चार तास मोबाईलचा वापर कमी करणार आहे, जेणेकरून माझ्या मुलाला मोबाईलच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करता येईल.” यावर संदीप घोरपडे यांनी संगीत शिक्षकाची आवश्यकता यावर जोर दिला, ज्याने विद्यार्थ्यांतील अपार उर्जा सकारात्मकतेत वळवली जाईल.
एक पालकाने यावर पुढे संकेत दिला की, “पालकांनी त्यांच्या मोबाईलचा वापर करून सामाजिक मीडिया साक्षरता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मुलांचे फेक अकाउंट्स तसेच इतर गैरप्रकारांना आळा घालता येईल.” या मेळाव्यात पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एकजुट होण्याची प्रतिज्ञा केली.
आजच्याच पालक मेळाव्यात एक पालकाने महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, की “आई-वडिलांच्या मोबाईलचा उपयोग करून समाजमाध्यमांवर निर्माण होणाऱ्या फेक अकाउंट्समुळे अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पालकांनी मोबाईल साक्षर होणे आवश्यक आहे.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “आजच्या डिजिटल युगात मुलांचा सामाजिक मीडिया वापर वाढत आहे, आणि त्यामुळे अपरोक्ष संवाद साधण्याच्या धंद्यात सामील होणारे धोके वाढले आहेत. मुलं फेक आयडी वापरून संवाद साधतात, यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.”
पालकांनी या बाबतीत जागरूक होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “आधुनिक काळात, समाजमाध्यमांचा योग्य उपयोग कसा करावा हे शिकणे, आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हाच काळाचा मागणी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
उपस्थित पालकांनी या मुद्द्यावर विचारविमर्श करून, आपल्या मुलांना या धोके पासून वाचवण्यासाठी सार्थक मार्गदर्शन देण्याची गरज असल्याचे सांगितले.
पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली…सुत्रसंचालन विलास चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी केले.

 

.मुख्याध्यापक.श्रीमती अनिता बोरसे,श्री.सुनील पाटील सर श्रीमती उंबरकर मँडम, श्री दिलीप पाटील, श्री.अनिल पाटील,यांनी पालकांशी हितगुज केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *