शांती व सामानतेचे ऊर्जा स्तोत्र श्री संत रविदास जी महाराज यांच नावे महाराष्ट्रात शांती स्थळ निर्माण व्हावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र भोळे महाराज
1 min read

शांती व सामानतेचे ऊर्जा स्तोत्र श्री संत रविदास जी महाराज यांच नावे महाराष्ट्रात शांती स्थळ निर्माण व्हावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र भोळे महाराज

Loading

शांती व सामानतेचे ऊर्जा स्तोत्र श्री संत रविदास जी महाराज यांच नावे महाराष्ट्रात शांती स्थळ निर्माण व्हावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र भोळे महाराज

 

उरुळी कांचन: संत शिरोमणी रविदासजी हे कबीर महाराजांचे परम शिष्य होते. समानतेचे प्रतीक , महान भक्ती योगी ,निष्काम कर्मयोगी रविदासजी महाराज यांनी सामाजिक विषमता ,अंधश्रद्धा, जातीभेद , नष्ट करण्याचा जीवनभर प्रयत्न केला. सेवा परम धर्म मानत तसेच समर्पण व त्याग ह्याची शिकवणूक त्यांनी जगाला दिली. संत रविदास जी महाराज साक्षात्कारी विभूती संत होते. परमेश्वराचे नामस्मरण करून चित्तशुद्धी करावी तसेच नेहमी अल्पसंतुष्ट राहावे, सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त मोलाचा संदेश श्री संत रविदास महाराजांनी दिला. शांती व समानतेचे ऊर्जा स्तोत्र श्री रविदास जी महाराज यांचे नावे महाराष्ट्रात ‘श्री संत रविदासजी शांती स्थळ ‘निर्माण व्हावे व त्यांच्या पवित्र स्मृती मुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा निर्माण होईल असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. चर्मकार महासंघ उरुळी कांचन व सर्व ग्रामस्थ उरुळी कांचन यांच्या वतीने येथे संत शिरोमणी श्री रविदासजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. भुजंगराव तुकाराम ओगले, राजाराम दादा कांचन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार, चक्रधर संचालक सना पाटील, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्र भोळे,माजी सरपंच पप्पू शेठ कांचन, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष जेबी सराफ, नियोजन मंडळाचे सदस्य अलंकार कांचन पाटील, माजी सरपंच भाऊसाहेब तुपे, सरपंच अमित बाबा कांचन, संजय बडेकर, सतीश तुपे, हेमलता ताई बडेकर, संजय बडेकर, सूर्यकांत मारुती कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी,उमेश म्हेत्रे, श्री कसबे, डॉ. सुंदरम सूर्यकांत कदम, डॉक्टर संदीप खरात, डॉ.सुनील गांगुर्डे, हरिचंद्र लोखंडे, चंद्रकांत कांबळे, निलेश लोखंडे, योगेश सातपुते, सुरेंद्र लोखंडे, अजय सूर्यवंशी, डॉ. सत्यम कदम, डॉक्टर संतोष बिरुटे हे उरुळी कांचन परिसरातील मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व संत शिरोमणी रविदासजी महाराज यांच्या फोटोला मान्यवरांनी हार अर्पण केला. सायंकाळी आठ वाजता हलगी सुमधुर वादनाने व आतिषबाजी करून श्री संतांची मिरवणूक काढण्यात आली. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजन उरुळी कांचन चर्मकार समाज यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे कार्यकर्ते निलेश पांडुरंग लोखंडे, योगेश सातपुते, चंद्रकांत कांबळे, अजय संभाजी सूर्यवंशी, सूर्यकांत मारुती कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, हरिचंद्र लोखंडे, सिताराम वेताळ, देवेंद्र कांबळे, विजय लोखंडे, रखमाजी लोखंडे, हनुमंत चव्हाण, डॉक्टर सुंदरम सूर्यकांत कदम, डॉक्टर संदीप खरात, डॉक्टर सुनील गांगुर्डे, डॉक्टर सत्यम कदम, सचिन शेलार, डॉ. संतोष बोरूटे, सुनील लोकरे, इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ह भ प अविनाश महाराज लेकुरे, तसेच ह भ प कुंजीर महाराज यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *