म्युनिसिपल हायस्कूल येथे संत सेवालाल महाराज जयंती  निमित्ताने अभिवादन
1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने अभिवादन

भुसावळ प्रतिनिधी

भुसावळ दिनांक १२ फेब्रुवारी : येथील नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ह.भ.प. लक्ष्मण महाराज हे होते. त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे , डी ए पाटील, डॉ. जगदीश पाटील, शिशिर जावळे शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या सह सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केले.शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे , डॉ ‌प्रदिप साखरे, यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी विविध प्रसंग सांगून माहिती दिली. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे एन‌.एच. राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *