श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय संत गुरु रविदास यांची जयंती
1 min read

श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय संत गुरु रविदास यांची जयंती

Loading

राष्ट्रीय संत गुरु रविदास जयंती साजरी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय संत गुरु रविदास यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री वाय. जे. पाटील यांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांसमवेत पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदरप्रसंगी विद्यार्थी जुनेद फकीर, तीर्थ बडगुजर ,उदय चव्हाण, भावना जाधव, आरोही लोट, विशाल पाटील, टीना थोरात, प्रणव संदानशिव, भावेश लोहार आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री डी .ए .सोनवणे सर यांनी राष्ट्रीय संत गुरु रविदास यांच्या जीवन कार्याचा परिचय देत असताना
” ज्ञानदीप घेऊनी हाती,
अंधश्रद्धा, विषमता गाळली मातीत, समता, बंधुभाव, विज्ञान, विश्वशांती, समाजात प्रबोधनाने केली प्रगती !” संत कोणाला म्हणावे ? तर ज्यांच्या विचाराने बुरसटलेली विचारसरणी, कर्मठ परंपरा, भेदभाव प्रवृत्ती, अत्याचाराच्या वाईट प्रथा, अशा विविध मनोरुग्ण विचार प्रवृत्तीला नष्ट करण्याची क्षमता ज्या व्यक्तीत असते ! त्यालाच संत समजावे.
राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात काशीजवळ झालेला आहे. त्यांच्या जन्मतारखेच्या बाबतीत लेखन अवस्था विषमतेची असल्यामुळे निश्चित उल्लेख मिळून येत नाही. आज त्यांची 648 वी जयंती साजरी केली जात आहे. तरीही त्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्यानुसार समाज प्रबोधन केले. त्यांनी आपल्या विचारातून समाज प्रबोधनाच्या कार्यास वाहून घेतले.
” मन चंगा, तो कठोती मे गंगा ” अशा प्रकारे पाणी हेच जीवन आहे. आणि आपले मन जर शुद्ध असेल तर गंगा आपल्या जवळच आहे. पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी पासून पाणी होते .म्हणून आपल्याला कुठेही विशेष अशा ठिकाणी गंगा स्नान करण्याची आवश्यकता नाही. पाणी हे गंगे समान आहे. म्हणून आपल्याला जिथे शक्य होईल त्या ठिकाणी स्थान केले तरी ते गंगे समान आहे. आणि त्यानुसार आपले विचार -आचार आणि मन शुद्ध असणे गरजेचे आहे.
तसेच ते आपल्या एका दोह्यातून समाजाचे चित्र स्पष्ट करतात —-!
” ऐसा चाहू राज मै,
जहा मिले सबनको अन्न,
छोट – बडे सब सम बसे,
रविदास रहे प्रसन्न —-!
या विचारातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी केलेलं कार्य किती महान आहे. हे आपल्या निदर्शनास येते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या -ज्या ठिकाणी मानव जात आहे. त्या ठिकाणी त्याला दोन वेळचं अन्न मिळणे गरजेचे आहे. नव्हे तर आवश्यकच आहे. परंतु आजची परिस्थिती सुद्धा आपल्याला बऱ्याच कुटुंबाला दोन वेळचे अन्न सुद्धा मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करणे भाग पडत आहे.तसेच कोणीही लहान आणि मोठा नाही सर्व समान आहेत त्यात कोणत्याही प्रकारचा धर्मभेद, जातीभेद, वंशभेद, लहान-मोठा भेद, पुरुष- स्त्री भेद नसावा.अशाप्रकारे त्यांनी आपल्या वेगवेगळ्या दोह्यांची विचारसरणी मांडून समाज प्रबोधनाचे कार्य केले. सदर प्रसंगी श्री पी. एम. ठाकरे, व्ही. डी. पाटील, ए. पी. जाधव, तसेच व्ही. डी. जाधव मॅडम एस. एस. तेले आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *