वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वाचन संस्कृती’ साजरी, जैतपूरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक भेट
![]()
वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वाचन संस्कृती’ साजरी, जैतपूरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक भेट
अमळनेर प्रतिनिधी
खान्देशातील जेष्ठ साहित्यिक तात्यासो वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त, चेतन सोनार यांनी जैतपूर येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेत वाचन संस्कृती सक्षम करण्याचे ध्येय ठेवून विद्यार्थ्यांना पुस्तक भेट दिलेस. याच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला आहे.
तात्यासो वा.रा. सोनार यांच्या चेतश्री प्रकाशनामुळे अनेक नवनिर्वाचित लेखकांना लिखाण करण्याची संधी मिळाली आहे. अमलनेरचा वैचारिक वारसा जोपासणे आणि टिकवणे यामध्ये सोनार यांचा योगदान अनमोल आहे. अनेक दिग्गज लेखक व विचारवंतांची विचार शिदोरी
अमळनेरच्या जनतेला लाभली आहे.
साने गुरुजींच्या “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने, ग्रामीण भागातील मुलांचे ज्ञान वाढावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी “वाचू या आनंदे, जगूया आनंदे” हा उपक्रम राबवण्यात आला, ज्याद्वारे तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला.

“आपण हा लिखाणाचा वारसा जपुया, वाचा, शब्द जोडा, व्यक्त व्हा… आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा संदेश साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने झळाळा आला, जेव्हा त्यांना सुंदर पुस्तकांनी भरलेले हातात मिळाले.
जैतपूर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक याने या उपक्रमाचे कौतुक केले. वाचनाच्या माध्यमातून मुलांच्या मनात सृजनशीलतेची बिजं रोवली जात आहेत, ज्यामुळे तात्यांच्या साहित्यिक वारशाला महत्त्वाचा आधार प्राप्त झाला आहे.

