शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ , पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरळीत सुरू
1 min read

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ , पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरळीत सुरू

Loading

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा अमळनेरला शुभारंभ

पाच दिवसीय प्रशिक्षण प्रताप हायस्कूलमध्ये सुरू

अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यातील सर्व शालेय शिक्षकांचे सक्षमीकरण आवश्यक ठरले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे, जे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे.
या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 11 फेब्रुवारी 2025 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या पाच दिवसीय प्रशिक्षणात इ. 1ली ते 5वी, इ. 6वी ते 8वी आणि इ. 9वी ते 12वी यासारख्या विविध शैक्षणिक टप्प्यांच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कुल क्रंमाक एकमध्ये प्रशिक्षणाचे तंज्ञ मार्गदर्शक सोपान भवरे, शरद पाटील, मुकेश पाटील, चेतन पाटील, स्मिता वानखडे आणि नेहा पाटील शालेय प्रशिक्षणात
उत्तम कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद पुनवटकर आणि देवेंद्र पाटील काम पाहत आहे..
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) भारत सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, ज्याद्वारे शिक्षणामध्ये नवीन दिशा आणि सुधारणा साध्य केली जात आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *