अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात २८फेब्रुवारी रोजी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*
![]()
*अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात २८फेब्रुवारी रोजी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*
धुळे(प्रतिनिधी)दि.११ का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था,धुळे आणि आय.क्यू.ए.सी.भाषा व सामाजिक शास्त्र विभाग जे. एस.एम.महाविद्यालय, अलिबाग,जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ (शुक्रवार, शनिवार) रोजी भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. यानिमित्ताने प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न होणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.उमेश बगाडे बीजभाषण करतील. याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड.गौतमभाई पाटील उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध आदिवासी लेखिका नजूबाई गावीत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर, का.स. वाणी स्मृती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शशिकांत धामणे, का.स. वाणी मराठी प्रगत अधययन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. बी. पाटील, का.स वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेच्या संचालक डॉ. वंदना महाजन उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचा समारोप समारंभ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील राज्यशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. गोपाल गुरू यांच्या अध्यक्षतेखाली तसेच का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठानच्या सचिव प्रा. डॉ. शोभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
माफुआ ते सौत्रांतिक मार्क्सवाद, जात, वर्ण, वर्ग, स्त्रीदास्यांतक भूमिका, शरद पाटील यांची सौंदर्यशास्त्रविषयक भूमिका, शरद पाटील तत्व आणि व्यवहार या विषयांवर चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये भारत पाटणकर, सुरेंद्र जोंधळे, सुधाकर गायकवाड, लता प्रतिभा मधुकर, किशोर ढमाले,
संध्या नरे-पवार, श्रीनिवास हेमाडे, देवेंद्र इंगळे, दिलीप चव्हाण, राहुल कोसंबी, अनिल सपकाळ, सचिन गरूड, राजेंद्र गोणारकर, संजयकुमार कांबळे, धम्मसंगिनी रमा गोरख, मृदुल निळे, नारायण भोसले, मीनल जगताप हे अभ्यासक सहभागी होणार असून चर्चक म्हणून देवकुमार अहिरे, विनोद कुमरे, ललित पाटील, अश्विनी तोरणे, सुनील वाघमारे हे सहभागी होणार आहेत.
या चर्चासत्रात खुल्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले असून चर्चासत्रासाठी वाचले जाणारे निबंध का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘आमची श्रीवाणी’ या नियतकालिकात प्रसिद्ध केले जाणार आहेत.
तरी या चर्चासत्रात प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. असे चर्चासत्राचे आयोजक डॉ. वंदना महाजन, प्राचार्या सोनाली पाटील, डॉ.आय.पी. कोकणे, डॉ.नीलकंठ शेरे यांनी आवाहन केले आहे.

