जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ याचे ऐतिहासिक यश! – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक!”
![]()
“जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ यांचा ऐतिहासिक यश! – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक!”
जळगांव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील हेत रिद्धी सचिन शेठने 2025 च्या जेईई मुख्य परीक्षेत भव्य यश मिळवले आहे. गणित, रसायन शास्त्र आणि भौतिक शास्त्र या विषयांत 99.95 पर्सेंटाइल गुण मिळवून त्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला आहे. रिद्धीचे हे यश त्याच्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फलित मानले जात आहे.
रिद्धीने आपल्या यशाबद्दल बोलतांना सांगितले की, तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाज सेवा करण्याचा दृढ निश्चय करतो. त्याच्या या विचारामुळे त्याला समाजातील सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन मिळत आहे.
हेत रिद्धी सचिन शेठच्या यशामुळे जळगाव जिल्हा गर्वित झाला आहे आणि त्याचे हे योगदान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या रिद्धीला पुढील वाटचालीसाठी सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा!

