शिक्षक दरबारात तक्रारींचा पाढा; आमदार किशोर दराडे यांनी घेतला शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार*
1 min read

शिक्षक दरबारात तक्रारींचा पाढा; आमदार किशोर दराडे यांनी घेतला शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार*

Loading

*शिक्षक दरबारात तक्रारींचा पाढा; आमदार किशोर दराडे यांनी घेतला शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार*

जळगाव | प्रतिनिधी

जळगावच्या नंदिनीबाई विद्यालयात आज आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी आपल्या समस्या मांडत तक्रारींचा पाढा वाचला.

महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब जे. के. पाटील शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एच. जी. इंगळे, जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब आर एच बाविस्कर, ज्युनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड , प्रा वंजारी सर ,प्रा सुधाकर ठाकूर प्रा राहुल वराडे समता परिषदेचे भरत शिरसाट, इकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक डॉ हारुन बशीर सर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

 

*शिक्षकांच्या समस्या अन् तक्रारी*

शिक्षकांनी आपल्या विविध मागण्या व अडचणी उपस्थित केल्या. यामध्ये

टप्पा अनुदानाचा प्रश्न

थकीत वेतन

मेडिकल बिले प्रलंबित राहण्याचा प्रश्न

वरिष्ठ वेतन श्रेणीच्या अडचणी

समायोजनामुळे निर्माण झालेल्या अडचणी

संस्थांमधील वादांमुळे शिक्षकांचे थांबलेले वेतन

शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शिक्षकांच्या समस्या मांडल्या. आमदार किशोर दराडे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या व जागेवरच काही समस्यांचे निराकरण केले.

*तत्काळ निर्णय व उपाययोजना*

आ. दराडे यांनी शिक्षण विभागातील अडकलेली मुख्याध्यापक मान्यता तत्काळ देण्याचे आदेश दिले. तसेच वेतनपथक कार्यालयाने वेतन नियमित वेळेवर अदा करावे, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

*टप्पा अनुदानाच्या संदर्भात*…
या मुद्द्यावर प्रा अनिल परदेशी व प्रा हुसेन शेख यांनी राज्यातील शिक्षकांना लवकरात लवकर वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय शिक्षक आमदारांची बैठक घेण्याची मागणी केली. यावर आमदार दराडे यांनी मुंबई आणि पुणे येथे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच १७ तारखेला आयुक्त कार्यालय, पुणे येथे शिक्षकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे निर्देश दिले.

*परीक्षा ड्युटीवर नाराजी*

जु.कॉ. संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे, प्रा. सुनील गरुड आणि शिक्षक नेते संभाजी आप्पा पाटील यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांमध्ये शिक्षकांच्या पर्यवेक्षणाच्या ड्युट्या चुकीच्या पद्धतीने लावल्या जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिक्षण मंडळ शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचे काम करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

*शिक्षक दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद*

या शिक्षक दरबारास जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे उपाध्यक्ष जे पी सपकाळे ,संचालक अजय पाटील , तुषार बोरसे , रवींद्र चव्हाण सर , संदीप घुगे सर ,एस के पाटील ,सी सी वाणी सर अशपाक सर मिलींद बागूल ,नाना पाटील नरू सपकाळे , जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, समस्या असलेले शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, वेतन अधिक्षक रियाज तडवी प्राथमिक वेतन अधिक्षक संदानशिवे मॅडम प्रतिभा सुर्वे उपशिक्षणाधिकारी पठाण साहेब, परदेशी साहेब , सरोदे साहेब यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेत, उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यामुळे उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *